The Mahrattas (मराठी)
The Mahrattas (मराठी)

@the_mahrattas

17 تغريدة 267 قراءة Nov 23, 2021
बारा मावळातील महरट्टा देशमुख 🚩
पश्चिम महाराष्ट्रातील पौराणिक मावळ प्रदेश हा दक्खन पठारावरील राजकीय दृष्ट्या सर्वात महत्वाचा प्रदेश आहे.📜
सातवाहनांची मूळ जन्मभूमी होण्यापासून ते देशभरातील हिंदू सार्वभौमत्वचे मुख्य स्थान होण्यापर्यंत सर्व काही या भूमीने पाहिले आहे. 👑
१/n
सातवाहनांचा उदय मावळातील इंद्रायणी नदीच्या काठी झाला. त्यांनी सर्व रट्टीका, भोजका,
पट्टनीका या क्षत्रिय जमातींना एकत्र केले आणि तिथून त्यांनी दक्षिणपथाचे पहिले साम्राज्य स्थापन केले.
त्यांना “महारथीगणकायीरो” असे संभोधले जायचे. 🚩
२/n
त्यानंतरच्या काळात महरट्टा हे महाराष्ट्र, गोवा, उत्तर कर्नाटक मधील भागामध्ये वास्तव्य करू लागले.
2000 वर्षांनंतर, त्याच बारा मावळच्या देशमुखांनी हिंदवी स्वराज्याच्या पायाभरणीत महत्त्वाची भूमिका बजावली.
त्या बारा मावळातील महारट्टा देशमुखांची कुळे पाहू -
३/n
(१) रोहीड्याचे खोरे -
रोहिडा खोऱ्यातील ४२ गावे हि "खोपडे-देशमुख" (अत्रौली प्रांत) आणि "नाईक जेधे-देशमुख" (भोर प्रांत) यांच्यामध्ये सामान प्रमाणात विभागली गेली होती.
४/n
(२) हिरडस मावळ खोरे -
या मावळातील ५३ गावे "नाईक बांदल देशमुख" यांच्या अखत्यारीत होती.
खिताब - इतबारराव { Lords Obeyed Inexorably }
५/n
(३) वेलवंडा खोरे -
या खोऱ्यातील ३३ गावे हि "डोहर धुमाळ-देशमुख" यांच्या अखत्यारीत होती.
खिताब - आढळराव { The Immovable Lords }
६/n
(४) गुंजन मावळ -
येथील ८१ गावे ही “शिळीमकर-देशमुख” यांच्या अंतर्गत होती.
खिताब - हैबतराव { Lords Of Terror }
७/n
(५) कानद खोरे -
या मावळातील देशमुखांना “मरळ-देशमुख” नावाने ओळखले जाते. यांच्या अंतर्गत ३३ गावे होते.
खिताब - झुंजारराव {The Rampaging Lords}
८/n
(६) मोसे खोरे -
येथील देशमुखी “पासलकर-देशमुख” यांच्याकडे होती. पासलकर देशमुख यांच्या अखत्यारीत ८२ गावे होती.
खिताब - यशवंतराव {Lords Of Glory}
९/n
(७) मुठा खोरे -
मुठा खोऱ्यातील देशमुखांना “नाईक-मारणे-देशमुख” म्हणून ओळखले जाते. यांच्या अंतर्गत १९ गावे होती.
खिताब - गंभीरराव {The Stoic Lords}
१०/n
(८) पौंड खोरे -
या खोऱ्यातील ८२ गावे हि “ढमाले-देशमुख” यांच्या अंतर्गत होती.
खिताब - राऊतराव {Lords Of The Cavaliers}
११/n
(९) पवन मावळ -
या मावळातील ३७ गावे हि “शिंदे-देशमुख” यांच्या आणि ४३ गावे “घारे-देशमुख” यांच्या अखत्यारीत होती.
खिताब - भूपतराव {Lords Of The Earth}
१२/n
(१०) नाणे मावळ -
या मावळातील ८८ गावे हि “गरुड-देशमुख” आणि “दळवी-देशमुख” यांच्यामध्ये विभागली गेली होती.
१३/n
(११) खेडबरे खोरे -
या खोऱ्यातील ४२ गावे “कोंडे-देशमुख” यांच्या अंतर्गत होती.
खिताब - इतबारराव {Lords Obeyed Inexorably}
१४/n
(१२) कर्यात मावळ -
या मावळातील ३६ गावे हि “पायगुडे-देशमुख” आणि “नाईक करंजवणे-देशमुख” यांच्यामध्ये विभागली गेली होती.
खिताब - रवीराव (पायगुडे- देशमुख) - {Lords Of The Sun Sun with rays}
भालेराव (नाईक कारंजवणे-देशमुख) - {Lords Of the Lances}
१५/n
तुळापूर येथील इंद्रायणी आणि भीमा नद्यांचा पवित्र संगम.
हि तीच इंद्रायणी जिथून साम्राज्य-निर्माण करणारे महान आंध्र-सातवाहनांचा उदय झाला.
आणि याच भीमेच्या तटावर शूर रांगडे मराठा लोक तयार झाले.
१६/n
संदर्भ -
A Note on the 'Twelve Mavals' of Poona District by Ian Raesideàe
१७/१७

جاري تحميل الاقتراحات...