#Thread :
'मल्हार, बाबासाहेब गेले'. मित्राने कॉल वर सांगितले. एका क्षणात डोळ्यावरची झोप उडाली आणि डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. आदल्या रात्री मी रात्री १ वाजता दिवेआगर वरून घरी आलो होतो. 1/24
'मल्हार, बाबासाहेब गेले'. मित्राने कॉल वर सांगितले. एका क्षणात डोळ्यावरची झोप उडाली आणि डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. आदल्या रात्री मी रात्री १ वाजता दिवेआगर वरून घरी आलो होतो. 1/24
घरी येतानाच ताम्हिणी घाटात थोड्या थोडक्या आलेल्या रेंज मुळे मला बाबासाहेबांची प्रकृती खालावली आहे अशी बातमी समजली होती. बातमी मिळाल्यापासून त्यांच्या प्रकृतीत सुधार व्हावा म्हणून अखंड जप सुरु होता. 'श्री राम जय राम जय जय राम'.... 2/24
'बाबासाहेब गेले' हे वाक्य कानावर पडताच, डोळ्यासमोर अंधारी आली. जणू, ती अविरतपणे गेले कित्येक दशकं धगधगत असलेली 'शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे' नावाची मशाल शांत झाल्यामुळे आपल्याही आयुष्यात अंधार झाला आहे. 3/24
बाबासाहेब काधीनाकाधीतरी जाणारच होते हे मेंदू जरी मला सांगत होता तरी माझे हृदय हि गोष्ट मानायला तयार नव्हते. 4/24
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी जरी आई बाबांनी लहानपणापासून सांगितल्या असल्या तरी छत्रपती शिवाजी महाराज डोळ्यासमोर जशेच्या तसे उभे करायचे काम निःसंशय पणे बाबासाहेबांनीच केले. राजा शिवछत्रपती हि कादंबरी लहानपणी कळत नसली तरी त्यातली चित्र पाहून मी त्यात रमून जायचो. 5/24
शिवाजी महाराज जिजाऊंसोबत चर्चा करतानाचे चित्र असो किंवा बाजीप्रभूंच्या पावनखिंडीतील राक्तबम्बाळ झालेले शरीर, या सगळ्या गोष्टींमुळे आपण त्या तिथे, त्यात चर्चेत किंवा त्या पावनखिंडीत आहोत असंच वाटायचं. मोठा झालो, तसे शब्द कळू लागले. लालित्य समजू लागलं. 6/24
शाळेपासून इतिहास माझा आवडता विषय जरी असला तरी बाबासाहेबांनी लिहिलेल्या त्या शिवचरित्रामुळे महाराज आमच्या समोर उभे राहिले आणि आम्ही आपसूक कुठेही महाराजांना पहिले कि मुजरा करू लागलो आणि इतिहास समजून घेण्याची आवड निर्माण झाली. 7/24
राजाशिवछत्रपती या पुस्तकाच्या पहिल्या पानावर बाबासाहेबांनी 'विविध देवतांना केलेले आवाहन वाचताना' आजही अंगावर काटा येतो.
मला आठवतंय तसं मी तिसरी चौथीत असताना बाबांनी शिवकल्याण राजा अल्बम ची कॅसेट आणली होती. 8/24
मला आठवतंय तसं मी तिसरी चौथीत असताना बाबांनी शिवकल्याण राजा अल्बम ची कॅसेट आणली होती. 8/24
शिवकल्याण राजमधील पहिल्या गाण्याच्या सुरवातीला बाबासाहेबांच्या आवाजातील '३०० वर्ष...३०० वर्ष महाराष्ट्र पारतंत्र्याच्या अंधकारात चाचपडत होता...' हे वाक्य ऐकून मी आणि माझ्या बहिणीने त्या वाक्याची कितीवेळा मिमिकारी करायचा प्रयत्न केला असेल देव जाणे. 9/24
शिवकल्याण राजा या अल्बम मधील गाणी जितकी सुंदर होती त्याहून रोमांचकारी होती, ती बाबासाहेबांच्या आवाजतली दोन गाण्यांमधली कॉमेंटरी. शिवकल्याण राज्याचे दोन भाग तोंड पाठ व्हायच्या मागचे कारण सुद्धा बाबासाहेबच.
बाबासाहेबांना एवढा मान का ? असा प्रश्न कायम विचारला जातो. 10/24
बाबासाहेबांना एवढा मान का ? असा प्रश्न कायम विचारला जातो. 10/24
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशावर ज्यांचे शासन होते त्यांनी शिक्षणाची सगळी डोर हि डाव्या विचारसरणीच्या तथाकथित बुद्धिवाद्यांच्या हाती सोपवून टाकली. त्या वेळेला, काही ठराविक लोकांचे उदात्तीकरण करायचे काम सुरु होते. 11/24
छत्रपती शिवराय आणि तत्सम वीरांचा उल्लेख म्हणावा तितका केला जात नव्हता. शिवचरित्रावर अनेकांनी अभ्यास केला होता, संशोधन केले होते. 12/24
पण ते सामान्य जनतेला समजेल, उमजेल आणि ते लोकप्रिय होईल यासाठी सोप्या भाषेत शिवचरित्र लोकांसमोर आणायचे काम केले ते बळवंत मोरेश्वर पुरंदरे अर्थात बाबासाहेब पुरंदरे यांनी. 13/24
झपाटलेला हा वेडा तरुण, महाराष्ट्राच्या गल्लीबोळात जाऊन, गडकोटांवर जाऊन, दर्या खोऱ्यांमध्ये जाऊन, असंख्य असंख्य लोकांशी संवाद साधून महाराजांचे चरित्र महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात पोहोचवत होता. 14/24
महाराज महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात माहित असले तरी त्यांची प्रतिमा, त्यांचे वर्तन, त्यांचे आचार विचार आपल्या डोळ्यासमोर उभे करायचे काम बाबासाहेबांनी केले यात शंका नाही. 15/24
जाणता राजा हे नाटक लोकांसमोर अत्यंत भव्य दिव्या स्वरूपात आणून किती तरी पिढ्यांना शिवचरित्राचा अभ्यास करायसाठी प्रेरित करायचे काम देखील बाबासाहेबांनीच केले. त्या काळी लहान असलेले, इतिहासकार होऊ पाहणारी मंडळी, बाबासाहेबांच्या छत्रछायेखाली मोठी झाली. 16/24
निनाद [काका] बेडेकर , यांसारखे दिग्गज देखील बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या त्या शिवमय वातावरणात इतिहासकार म्हणून मोठे झाले. बाबासाहेबांनी केवळ एक किंवा दोन पिढ्या नाहीत तर जवळपास ४ पिढ्यांना इतिहासाचा अभ्यास करून तो जगासमोर मांडण्याचे वेड लावले. 17/24
आज माझ्या वयातील अनेक जण, बाबासाहेबांनी लिहिलेले शिवचरित्र वाचून, त्यातून प्रेरणा घेऊन, नवीन संशोधन करून, शिवचरित्रातील वेगवेगळे शोध जगासमोर मांडण्यासाठी उत्सुक आहेत. बाबासाहेबांनी रचलेल्या मजबूत पायामुळेच हे शक्य होत आहे. 18/24
बाबासाहेबांच्या इहलोकातून परलोकाकडे झालेल्या गमनानंतर अनेक समाजकंटकांनी त्यांच्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला. त्यांची जात काढली. जानवे घातलेला इतिहासकार वगैरे वगैरे असे शब्द वापरले. 19/24
पण त्या पुरषोत्तम खेडेकर किंवा श्रीमंत कोकाटेंसारख्या गल्लीबोळातल्या इतिहासकारांना बाबासाहेबांएवढे कधीही मोठे होता येणार नाही, याच एका गोष्टीमुळे, त्यांची व त्यांच्या चेल्या चपाट्यांची होणारी तडफड पाहून मला मनोमन आनंद झाला. 20/24
बाबासाहेबांवर थुंकणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. खेडेकर व कोकाटे सारखी मंडळी या पलीकडे काहीही करू शकत नाहीत हे सर्वांना आणि त्यांना देखील ज्ञात आहे.
बाबासाहेबांच्या निधनामुळे मी असे मुळीच म्हणणार नाही कि महाराष्ट्र पोरका झाला किंवा मोठे नुकसान झाले. 21/24
बाबासाहेबांच्या निधनामुळे मी असे मुळीच म्हणणार नाही कि महाराष्ट्र पोरका झाला किंवा मोठे नुकसान झाले. 21/24
ते आपल्यात शरीराने नसले तरी त्यांची व्याख्यानं, त्यांनी लिहिलेलं शिवचरित्र, जाणता राजा, त्यांचे संस्कार, त्यांचा तो उत्साह, त्यांचा तो वेडेपणा आणि इतिहास समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचा ध्यास आपल्या सगळ्यांच्या नसानसांमध्ये भिनला आहे. 22/24
جاري تحميل الاقتراحات...