Umesh Khandelwal
Umesh Khandelwal

@umeshk1881

5 تغريدة 39 قراءة Nov 04, 2021
Thread:
१.
आज लक्ष्मीपूजन आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दीपावलीचे लक्ष्मीपूजन नावाची कविता लिहिली आहे.या कवितेत त्यांनी विदेशी वस्तूंवर बहिष्कार घालण्याच्या उपदेश केला आहे.ही कविता सावरकरांनी रत्नागिरीच्या स्थानबद्धतेत वर्ष १९२५ मध्ये रचली. ती आपल्याला आजही मार्गदर्शन करणारी आहे
२.
देश स्वतंत्र झाला तरी आपण स्वदेशी वस्तू खरेदी न करता परकीय वस्तू खरेदी करत आहोत. त्यामुळे आपण आपल्या घरी लक्ष्मीचे पूजन केले तरी ती आपल्यावर प्रसन्न न होता रागावणार आहे. असे सावरकर या कवितेतून आपल्याला सांगत आहेत. त्या कवितेतील काही अंश खालीलप्रमाणे..
३.
लक्ष्मी पूजन करू घरोघर,
आम्ही जरी भावे
प्रसन्न पूजेने ना होता,
लक्ष्मी रागावे
आणि विदेशी नळे फटाके,
फुलबाजा अंती
उडवूनी डिंडिमा पिटू,
आपल्या मुर्खांच्या जगती
अहो हिंदूंनो, कोटी कोटी रुपयांची,
या दिवशी
लक्ष्मी पूजावयासी लक्ष्मी,
धाडू विदेशासी
४.
म्हणून आम्ही जरी पुजू घरोघरी,
ही लक्ष्मी भावे
प्रसन्न पूजने ना होता
लक्ष्मी रागावे
तरी हिंदूनो, घरात लक्ष्मी,
आधी आणावी
विदेशासी ना शिवू शक्य तो,
वृत्ती बाणवावी
देशी तेले, देशी साबू,
देशी वस्त्राने
देशी साखर , देशी अस्त्रे,
देशी शस्त्राने
स्वदेशलक्ष्मी पूजू साधुनी,
५.
जरी मंगल वेळ
गजांतलक्ष्मी हिंदू हिंदूच्या,
दारी डोलेल
- स्वातंत्र्यवीर सावरकर

جاري تحميل الاقتراحات...