Devashish Kulkarni
Devashish Kulkarni

@AjaatShatrruu

14 تغريدة 44 قراءة Oct 17, 2021
#KnowPune : पुण्याची पर्वती
पर्वती - श्रीमंत नानासाहेब पेशवे ह्यांच्या मातृभक्तिचे आणि स्वामीनिष्ठेचे प्रतीक.
आपल्या मातोश्री काशीबाईसाहेब ह्यांची पदपीडा हरण करणाऱ्या आणि नवसाला पावलेल्या पर्वताई देवी (भवानी) चे मंदिर नानासाहेबांनी बांधले.
#MarathaHistory
१/१३
नानासाहेबांनी एक भव्य मंदिर या टेकडीवर उभे केले आणि तेथे देवदेवश्वराची स्थापना केली.
श्रीमंतांनी मातृप्रेमाप्रमाणेच स्वामीनिष्ठा व्यक्त करण्यासाठी शाहू छत्रपतींच्या पादुकांची प्रतिष्ठापना तेथे केली.
२/१३
४ कोपऱ्यांत ४ मंदिरे बांधून त्यांत देवी, गणपती, सूर्य व विष्णू यांची स्थापना करून मंदिरांचे पंचायतन निर्माण केले.
नानासाहेबांनी देवतांच्या सान्निध्यांत रहावयास मिळावे म्हणून १७५४ साली पर्वतीवर एक वाडा बांधला. पर्वतीच्या या संपूर्ण बांधकामास १४ वर्षे लागली. (१७४७-१७६१).
३/१३
मंदिराच्या कळसास १०८० तोळ्यांचे सोने चढविले. गंडकीहून विष्णू मूर्तीसाठी शिळा आणविली.
मंदिरांतील गणपती आणि देवीच्या मूर्ती सुरवातीस सोन्याच्या होत्या, असे म्हणतात.
पर्वतीचे माहात्म्य आणि नानासाहेब पेशव्यांचे कर्तृत्व सांगताना एक आधुनिक कवि श्री अनंततनय म्हणतो :
४/१३
या मंदिराच्या समूहात राघोबादादाने कार्तिकेय स्वामीचे मंदिर बांधले.
आजही पर्वतीवर ही सगळी मंदिरे सुस्थितीत बघयला मिळतात. मंदिरांमधील मूर्त्या विलक्षणीय आहे. इतक्या सुंदर की बघतंच रहावेसे वाटते.
५/१३
देवदेवेश्वर संस्थान ने पर्वतीवर पेशवा संग्रहालय बांधून तेथे मराठ्यांचा गौरवशाली इतिहास दाखवणाऱ्या असंख्य अनमोल गोष्टी प्रदर्शनास ठेवल्या आहेत.
विविध सरदारांची चित्र, दुर्मिळ पत्र, पोथ्या, नाणी, मूर्त्या, अंगरखे, नकाशे आदि पाहून मंत्रमुग्ध होयला होतं.
६/१३
१८७५ साली, विक्टोरीया राणीचा ज्येष्ठ पुत्र एडवर्ड (Edward VII) जेव्हा पुण्यात आलेला, तेव्हा तो हत्तीवर बसून पर्वती वर गेलेला.
वर जात असताना, ५६ व्या पायरीवर हत्तीचा पाय सटकला आणि एडवर्ड अंबारीतून खाली पडला.
इंग्रजांच्या होणाऱ्या राजाची ही फजिती जाम मजेशीर होती.
७/१३
देवदेवेश्वराच्या देवळावरील गच्ची ही एक पुणे दर्शनाची आणि टेहळणीची जागा मानली जाते.
पर्वतीवरून केलेले समस्त पुण्यनगरीचे अवलोकन आजही सुखावह वाटते.
८/१३
🔸श्रीमंत नानासाहेब पेशवे ह्यांच्या पूजेतील शाळीग्राम
🔸न्यायमूर्ति रामशास्त्री प्रभूणे ह्यांच्या पूजेतील राम-सीता-लक्षमण
🔸क्रांतिवीर चापेकर बंधू ह्यांनी स्थापन केलेला मारुती
९/१३
श्रीमंत नानासाहेब पेशवे ह्यांचे चिरविश्रांती स्थान…
देवदेवेश्वर संस्थान लवकरंच पर्वतीवर पानिपतात मायभूमिच्या रक्षणार्थ धारार्थी पडलेल्या वीर मराठ्यांच्या सन्मानार्थ एक स्मारक बांधत आहे.
पानिपतात वीरगती प्रात्प झालेल्या योद्ध्यांची नावे👇🏼
१०/१३
पेशवे संग्रहालयातील काही दुर्मिळ चित्रे👇🏼
🔸श्री शिवसमर्थ योगाचे दर्शन
🔸सुभेदार मल्हारराव होळकर
🔸सरदार जयप्पा राणोजी शिंदे
🔸न्यायमूर्ति रामशास्त्री प्रभूणे
११/१३
पेशवे संग्रहालयातील काही दुर्मिळ चित्रे👇🏼
🔸श्रीमंत थोरले माधवराव
🔸अलिजा बहाद्दूर नायब वकील-उल-मुतलक महादजी शिंदे
🔸सरदार पिळाजीराव जाधवराव
🔸श्रीमंत अमृतराव पेशवे
१२/१३
पेशवे संग्रहालयातील काही दुर्मिळ चित्रे👇🏼
🔸ब्रह्मेंद्रस्वामी (पुण्यश्लोक शाहूछत्रपती, राऊ-अप्पा, आंग्रे, राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर आदि ह्यांचे गुरु)
🔸गोब्राह्मणप्रतिपालक पुण्यश्लोक शाहूछत्रपती
🔸मातोश्री राधाबाई, थोरले बाजीराव व मल्हारराव होळकर
🔸मातोश्री ताराबाई
१३/१३
@rattibha unroll

جاري تحميل الاقتراحات...