Chetan Dixit 🚩
Chetan Dixit 🚩

@mechetandixit

11 تغريدة 26 قراءة Oct 16, 2021
#थ्रेड
भारताच्या संरक्षण क्षेत्रात एक अभूतपूर्व क्रांती होऊ पाहत आहे..
काल दसऱ्याचा मुहूर्त साधत भारताने शस्त्रसज्जतेकडे एक भरभक्कम पाऊल टाकले आहे..
काल मोदींनी संरक्षण क्षेत्रातील सात कंपन्या स्थापन करून त्या देशाला अर्पण केल्या..
ह्या सात कंपन्या ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड (1/11)
ह्या सडत ठेवलेल्या संस्थेचे विघटन करून बनवल्या गेल्या आहेत. काँग्रेसच्या संरक्षण संदर्भातील कुचक्या आणि कुजक्या धोरणाचा ढळढळीत पुरावा म्हणजे हा बोर्ड..
ह्या संदर्भातील कारखान्यांचा इतिहास १७१२ पर्यंत मागे जातो, ज्याची मुहूर्तमेढ डच लोकांनी रोवली होती. पण ह्या बोर्डची (2/11)
अधिकृतरित्या स्थापना १९८९ साली केली गेली.
अपेक्षा काय होती? तर सैन्याला, म्हणजे पायदळ, वायुदळ आणि नौसेनेला जे काही लागेल म्हणजे शस्त्रे, वाहने, गोळ्या, इतर जे काही गरजेचे लागेल त्याचा पुरवठा करणे.
नेमकं काय होत होतं? इंग्रजीत ज्याला बायस्टॅंडर्ड म्हणतात त्यापेक्षाही (3/11)
खालच्या दर्जाचे उत्पादन ह्या फॅक्टर्यांमधून होत असे. सेनेचे अजिबात समाधान होत नसे. शस्त्रे अजिबात अपडेटेड वा विश्वासार्ह तर सोडाच अगदी सुरक्षितसुद्धा नसत.परिणामस्वरूप ते तसेच वाया जात, कारण ते तसेही उपयोगाचे नसायचे.
ह्यापेक्षा एक भयंकर प्रकार चालत असे ज्याचा देशाला सर्वात (4/11)
मोठा धोका होता तो म्हणजे ऐन युद्धाच्यावेळी ह्या फॅक्टरी मधील युनियन संपाच्या पावित्र्यात असत.
म्हणजे हा बोर्ड म्हणजे असेट कमी आणि लायबिलिटी जास्त असा प्रकार होता..
काँग्रेसने एक एक संस्था कशा कुजवून सोडल्या हे सर्वश्रुत आहेच पण संरक्षणाच्या बाबतीतला पराकोटीचा हलगर्जीपणा (5/11)
देशाला किती महागात पडला असता. सैन्याच्या मनोधैर्याने किती आणि कशी खिंड लढवली आहे आणि देशाचे संरक्षण केले हे त्यांचा जाज्वल्य इतिहास सांगतोच. पण जर त्याला आधुनिकतेची जोड मिळाली असती तर सैन्याची हानी कमी झाली नसती? ह्या बोर्डाच्या नादाने जो काही पैशाचा असमर्थनिय असा अपव्यय (6/11)
केला गेला आणि बांडगुळं जगवली गेली, ते टाळलं गेलं नसतं? ह्यांच्या काळात अत्यंत बेजबाबदार आणि दळभद्री असे संरक्षणमंत्री देशावर लादले गेले ह्याची इतिहास ठळकपणे नोंद घेईल आणि नाही घेतली तर ती आम्ही घ्यायला लावूच..
ज्या काळात शीत युद्धाच्या छायेत जग होतं. सतत युद्धाच्या छायेत (7/11)
जग वावरत होतं. जवळपास राष्ट्रे स्वतःला आधुनिक बनवत होती. तेंव्हा भारत काय करत होता? कुस्तीनं युद्ध जिंकणार होता? संरक्षण क्षेत्रात भारताला कित्येक दशके मागे नेण्याचे पाप ह्या बोर्डाच्या माध्यमातून केले गेले..
(असलाच अजून बोर्ड होता "बोर्ड ऑफ इंडस्ट्रीयल फायनांसिंग (8/11)
रीकन्स्ट्रक्शन" हे तर एका मजबूत घोटाळ्याचं काँग्रेसने खत वगैरे घालून वाढवलेलं कुरण होतं.. जे २०१६ ला बंद करण्यात आलं.. त्यावर परत कधीतरी लिहीन..)
ह्या बोर्डच्या अंतर्गत ४१ फॅक्टरीज काम करत होत्या. आता त्यांचे एकत्रीकरण करून केवळ सात कंपन्या बनवल्या गेल्यात ज्यावर १००% (9/11)
शासनाचे नियंत्रण असेल आणि ज्या ज्या बाबतीत ह्या बोर्डाने माती खाल्ली त्या सर्वांची काळजी ह्या कंपन्या घेतीलच ह्यात मला काहीच शंका नाहीये..
कारण निंदा नाही तर डायरेक्ट घुसून बाजार उठवणारा देश अशी माझ्या देशाची ओळख झालीये..
जय हिंद..
- चेतन दीक्षित (10/11)
"माझ्या देशाकडे नजर वर करून तर सोडाच तसा विचारसुद्धा करायचा मानस कोणताही देश करणार नाही" एवढ्या पातळीवरगेलेला माझा देश मला बघायचाय.. फक्त त्याला मोदींसारखं नेतृत्व दीर्घकाळ मिळालं पाहिजे. (11/11)

جاري تحميل الاقتراحات...