मनोज सोनवणे बागलाणकर 🚩
मनोज सोनवणे बागलाणकर 🚩

@shivbhakt_M15

16 تغريدة 18 قراءة Sep 15, 2021
#थ्रेड
सात ते आठ बलात्कार झाले महाराष्ट्रात ३_४ दिवसांमध्येच 😢
प्रश्न असा पडतो हा तोच महाराष्ट्र आहे का माझ्या शिवरायांचा ? शिवकाळात बलात्कार केल्यावर चौरंग केला जाई. मग चुकतंय काय? की आपली बहीण आज घरा बाहेर पाय काढल्यावर घरात वापस येई पर्यंत जीव कासाविस होतो.👇
(1/n)
याला फक्त सरकार च जबाबदार का?
प्रश्न खुप सारे येतात मनात पण उत्तर मिळतंय ते एकच हिंदु झोपलाय 💯
आपल्याला जर सरकार आणि कायद्या विरुद्ध का असेना .. जावून आपल्या बहिणीला न्याय मिळवून देवू शकत नाही.. 😡🤐
असो थ्रेड चा महत्वाचा घटक म्हणजे रांझाच्या पाटलाचा चौरंग केला.
(2/n)👇
पुण्यापासून नऊ कोसांवर असलेल्या रांझे गाव येथील ही घटना. सन १६४६ ची संक्रांत तिळगुळाच्या गोडव्यासह आनंदाने साजरी झाली. आई जिजाऊ आपल्या सुनांना घेऊन खेड शिवापुरी येथे थांबल्या होत्या. तेव्हा तेथे अचानक एक पत्राशीतला बाप आर्त दुःखाने टाहो फोडत आपल्या विशीतल्या तरुण पोरीचं👇
(3/n)
प्रेत घेऊन जिजाऊंच्या पुढ्यात उभा ठाकला. राग अनावर जाऊन माता जिजाऊंनी प्रेताच्या चेहऱ्यावरील पदर दूर सारत प्रेत न्याहळले. त्या मृत पोरीच्या आक्रोश करणाऱ्या बापाकडे विचारपूस केल्यावर कळले की, त्या निष्पाप पोरीसोबत " बदअंमल " म्हणजे बलात्कार करून हत्या करण्यात आली होती.👇
(4/n)
अशी अनितीची गोष्ट माता जिजाऊ आणि शिवाजी महाराजांना खपणारी नव्हती.
रांझे हे गाव जिजाऊंच्या मालकीचे त्यांच्या वैयक्तिक खर्चासाठी ह्या गावची मालकी आऊसाहेबांकडे आणि त्यांच्याच गावात हा गुन्हा म्हणजे घोर पाप कारण रयतेवर प्रेम करणारी आई 👇
(5/n)
रयत नासवना-यांच्या विरुद्ध जणू चंडीचे रूपच धारण करण्याची वेळ आली होती. परंतु राजे आता जाणते झाले होते, त्यांनी याचा निवाडा करण्याचे ठरवले. छत्रपती शिवाजी महाराजांनी तातडीने बाबाजी बिन भिकाजी गुजर पकडुन आणण्याचे मावळ्यांना आदेश दिले .👇
(6/n)
मावळे दिवस मावळल्यावर रिकाम्या हाताने परतले. रिकाम्या हाती परतण्याचे कारण विचारल्यावर मावळे शिवरायांना सांगू लागले की, रांझाचा पाटील म्हणतोय कोण शिवाजी? कुठला शिवाजी? आम्ही आदिलशहाचें जुने वतनदार आहोत. (शिवराय फक्त १६ वर्षाचे होते तेव्हा)👇
(7/n)
आम्ही त्या पोरीसोबत जे काही कृत्य केले तो आमचा अधिकार आहे." रांझाच्या पाटलाचे असले उर्मट उत्तर ऐकून शिवरायांना राग आला. जिजाऊंच्या डोळ्यात अंगार थांबत नव्हता. रांझाचा पाटील उद्या सकाळी आपल्यासमोर हजर होईल असे वचन शिवरायांनी मांसाहेबांना दिले.👇
(8/n)
शिवरायांनी येसाजीस बोलावून घडलेले सारे वृत्त सांगितले. येसाजी तडक रांझा गावी गेला व मध्यरात्री पाटलाच्या वाड्यास वेढा घातला. दरवाजा फोडून वाड्यात शिरला आणि रांझाच्या पाटलाच्या मुसक्या बांधून बैलगाडीत टाकले. सकाळी तांबडं फुटत असतांनाच पाटलास शिवरायांसमोर उभे केले.👇
(9/n)
न्यायनिवाडा करण्यासाठी सर्वांसमोर महाराजांनी बाबाजीची चौकशी केली, चौकशीअंती गुन्हा सिद्ध झाला. या गुन्ह्याला आता महाराज कोणती शिक्षा देणार याचा अंदाज कोणालाही लागत नव्हता.👇
(10/n)
शिवरायांनी कठोर शिक्षा देण्याचे फर्मान दिले, त्वरित त्याची पाटीलकी जप्त केली गेली. त्याचे हातपाय तोडावेत अशी आज्ञा केली या शिक्षेची अंमलबजावणी झाली आणि त्या पाटलाचा चौरंग करण्यात आला. 👇
(11/n)
शिक्षेमुळे बाबाजी अपंग झाला पण त्या पाटलाचा एक भाऊबंद सोनाजी गुजर हा त्याचे पालन करायला उभा राहिला आणि बाबाजीच्या अपराधाबद्दल शिवाजी महाराजांकडे माफ़ी मागितली म्हणून शिवाजी महाराजांनी बाबाजी पाटील याची पाटीलकी सोनाजी गुजर यास दिली..👇
(12/n)
अशा पद्धतीने निग्रह म्हणजे शिक्षा आणि अनुग्रह म्हणजे कृपा या राजसत्तेच्या दोन्ही बाजू शिवाजी महाराजांनी रयतेच्या प्रत्ययाला आणून दिल्या असे दिसते..👇
(13/n)
रांझाच्या पाटलाच्या याबाबतचे पत्र हे शिवाजी महाराजांची राजमुद्रा असलेले पहिले पत्र आहे आणि याची इतिहासात नोंद असलेली तारीख आहे २८ जानेवारी १६४६
पत्र👇
(14/n)
संदर्भ - १) मराठा सत्तेचा उदय - डॉ. जयसिंगराव पवार
२) अशी होती शिवशाही - अ. रा. कुलकर्णी
धन्यवाद🙏
#Manoj_writes
@Rajgurunagar
@PunekarVoice
@The_NitinD

جاري تحميل الاقتراحات...