Umesh Khandelwal
Umesh Khandelwal

@umeshk1881

9 تغريدة 3 قراءة Sep 05, 2021
१.
🚩🚩🚩🚩🚩
*आम्ही हाफ पॕन्टवाले.*
पूर्वी आमच्या शाखेच्या "हाफ पॅन्टला" दात विचकत हसायचे, स्वत: मात्र बर्मूडा घालून मिरवायचे... तरीही *आम्ही आत्मियतेनं रक्षाबंधन उत्सवानंतर राख्या बांधायला आणि मकरसंक्रांती उत्सवानंतर तिळगुळ आणि लाडू द्यायला त्यांच्या घरी जात राहीलो.*
२.
नंतर दोन जणांच्या उपस्थिती असलेल्या शाखेवर हसत स्वत: मात्र घरदार भरण्यासाठी जगायचे....
मग आमच्या शाखेतल्या खेळांवर हसायचे...जेव्हा ते घरात बसून ढे-या वाढवायचे...मात्र *संकटसमयी त्यांना आमचीच आठवण यायची आणि आम्ही?कोडगे ना आम्ही! त्यांनी हाक मारली न मारली तरी धावून जात राहीलो.
३.
आमच्या विचारांच्या प्रेरणेनं स्थापन झालेल्या पक्षाच्या निवडून आलेल्या केवळ दोन खासदारांना हसायचे.....
#३७० व ३५ब या मुद्द्याला विनोदाची वारी दाखवत... राम मंदिरा विषयी म्हणायचे तारीख नहीं बताएंगे...आणि आम्ही ?.....
४. *न थकता ३७०, ३५ब, राममंदीर ह्या बाबतीत आम्ही करत असलेल्या अभियानाची त्यांना माहिती देत राहीलो, गंगाजल पूजन, भारतमाता पूजन, रामशिला पूजन अशा सांस्कृतिक कार्यक्रमांना त्यांना सादर निमंत्रण देत राहीलो.*
५.
आम्ही नेभळट, बावळट बंडू, घाबरट सदू असे आम्हाला हे हिणवायचे ....आम्ही मात्र *दंगलींच्या काळात त्यांच्याच रक्षणासाठी डोळ्यांत तेल घालून आणि टिंगलीचे विषय झालेले आमचे "दंड " हातात घेऊन रस्त्या रस्त्यांवर दिवस रात्र फिरत राहीलो.
६.
अपघात, नैसर्गिक आपदांच्या काळात "त्याच आमच्या हाफ पॕन्ट्स" घालून सर्वोपरी सहाय्यता कार्यात स्वतःला झोकून देत मग्न राहीलो ... अनेकदा विना झोप आणि उपाशी राहून सुद्दा.*
७. आता आमच्या अखंड भारत संकल्प दिना विषयी विनोद करीत मिश्किल हसतात.....
दर वेळी तोंडावर पडतात तरी हसतात...
*यांचे नातू पणतू पर्यटनाला सिंधू किनारी नाही गेले तर बोला.* त्यांना जसं वागायचंय ते वागू द्या .... आम्ही जे करत आलो ते करतच रहाणार ....
८. *कारण .... ते कसेही असले, कसेही वागले तरी ते आमचेच आहेत. त्यांना ह्याचं भान नसलं तरी आम्हाला आहे ना!*
म्हणूनच ..... *चरैवेति! चरैवेति! चरैवेति!*हसणारे हसतील... काहींच्या पायाखालची जमीन सरकते आहे , काहींच्या सरकली आहे....काहींच्या सरकणार आहे.
९.
आमच्यातीलच एक वेडे ...
ज्यांना ते "अटलजी" म्हणतात, ते सांगून गेले आहेत .
जब तक लक्ष्य ना पूरा होगा,
तब तक पग की गती ना रूकेगी,
आज कहे चाहे कुछ दुनिया
कल को बिना झुके ना रहेगी.
हाच इतिहास आहे..हेच भविष्य आहे.
🙏*संघ शक्ती युगे युगे*
*जय श्री राम*

جاري تحميل الاقتراحات...