Barty Crouch Jr
Barty Crouch Jr

@barty_croutch

22 تغريدة 468 قراءة Aug 31, 2021
असा कसा बाई माझा भोळा शंकर, रावणास आत्मलिंग दिले काढून!!!
विश्वातील सर्व प्राणीमात्र ज्याला पूजतात, असा भोळ्या शंकरा शिवाय दुसरा कोणी देव नाही, असं म्हटलं तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही. शंकराची पूजा देव-दानव, यक्ष, किन्नर गंधर्व, भूत -पिशाच्च , नाग अशा सर्व लोकांत केली जाते .
रावण , भस्मासुर, तारकासुर, अंधक असे कित्येक दानव शंकराचे निस्सीम भक्त होते. त्यांची भक्ती, तपश्चर्या पाहून भोळ्या शंकराने त्यांना अनेक वरदाने दिलेली आपण पाहिलेली आहे . प्रामुख्याने शंकराची पूजा लिंग स्वरूपात केली जाते. शिवलिंगा वरील लिंग व ज्यावर लिंग आहे ती शाळुंका ,
हे स्त्री पुरुषांच्या मिलनाचे प्रतिक असल्याने त्यात प्रचंड ऊर्जा असते .म्हणून रज:स्वला स्त्री ने शिवमंदिरात जाऊ नये असा नियम आहे.
जेव्हा समुद्रमंथनातून आलेले विष महादेवांनी प्राशन केले त्यामुळे त्यांच्या अंगाचा दाह झाला, तेव्हापासून लिंगावर जलाभिषेक करण्याची प्रथा पडली.
महादेवाची उपासना सगुण आणि निर्गुण रूपात केली जाते. शंकराचे लिंग निर्गुण रूपात पूजतात. तर शंकर मूर्ती सगुण उपासनेत पुजली जाते. जगात फक्त तीन ठिकाणी शंकराच्या मुखाचे पूजन केले जाते.
1. भारत रुद्रनाथ एकानन मुख
2. नेपाळ पशुपतीनाथ चतुरानन
मुख
3. इंडोनेशिया शिवमंदिर पंचानन मुख.
त्यातील आज पंचकेदार मधील चतुर्थ केदार रुद्रनाथ याची माहिती पाहणार आहोत.
भारतातील उत्तराखंड राज्यात चमोली जिल्ह्यात रुद्रनाथ मंदिर समुद्र सपाटीपासून 3600 मीटर उंचीवर आढळून येते. मागील लेखात पाहिल्या प्रमाणे युद्धानंतर पांडवांना सगोत्र हत्या या
पापातून मुक्ती शंकराच्या आशीर्वादामुळे मिळते . शंकर पांडवांना सदेह दर्शन न देता पाच ठिकाणी निरनिराळ्या अंगाचे दर्शन देऊन त्यांना स्वर्ग प्राप्ती करून देतात. ही ठिकाणे आज पंचकेदार म्हणून प्रसिद्ध आहेत. रुद्रनाथ मंदिर पांडवांनी बांधलेले आहे . येथे शंकराच्या मुखाची पूजा एकानन
स्वरूपात केली जाते. ही मूर्ती स्वयंभू असल्याने आजपर्यंत मूर्तीची खोली कोणासही माहित नाही. लिंगावर शिव मुखाचे दर्शन होते. त्यावर नाक, कान ,तोंड, डोळे अवयव स्पष्ट दिसून येतात. मूर्तीची मान एका बाजूला वाकडी झालेली दिसून येते. मंदिरातील मूर्ती चे दिवसाच्या तीन वेळेस तीन
रूपे दिसून येतात. सौम्य रूप, रुद्र रूप, निर्माण रूप आपल्याला बघता येतात. याही मंदिराचे कपाट शीत कालात सहा महिने बंद असते . तेव्हा प्रतीकात्मक मूर्तीपूजन गोपेश्वर येथे केले जाते. भारतात दक्षिण मुखी शिवमंदिर फक्त रुद्रनाथ व उज्जैन येथे आहेत. असे म्हणतात अशा दक्षिणमुखी मंदिरात
पूजाअर्चा केली असता ज्ञानप्राप्ती होते. सर्व मनोकामना पूर्ण होतात . रुद्रनाथ येथील मुर्तीस 'नीलकंठ महादेव ' असे संबोधले जाते.
या मंदिराची चढाई 22 ते 24 किलोमीटर आहे. पंचकेदार मधील ही सर्वात अवघड यात्रा आहे . यात्रा कालावधी 2 ते 3 दिवसाचा असतो. यात्रा ही पूर्णवेळ 'रोडोडेंड्रोन'
जंगलातूनच करावी लागते . शहरीकरणाचे वारे नसल्याने रस्ता मानवनिर्मित नाही . ओबडधोबड दगडातून वाट काढून चालावे लागते. ही यात्रा यात्रेकरूंची शारीरिक - मानसिक ताकद व सहनशक्तीची परीक्षा घेते . रस्त्यात राहण्यासाठी खाण्यासाठी अगदीच झोपडीसारखी व्यवस्था असते . वातावरणातही सतत बदल होत
असतात. कधी तीव्र ऊन तर कधी सोसाट्याचा वारा, पाऊस ,सोबतच अत्यंत गारवा. शारीरिक -मानसिक श्रम, सोयीचा अभाव अशा मुळे ही यात्रा पूर्ण करणे फार कठीण असते. पण भाविकांचे असे म्हणणे आहे की कोणती तरी अज्ञात शक्ती तुम्हाला अद्भुत ऊर्जा देते. जंगलातून जाताना अलौकिक सृष्टी सौंदर्य दिसून येते.
टप्प्याटप्प्यावर 'अल्पाइन' घासाचे पट्टे म्हणजेच बुऱ्हाण दिसून येतात. तेथेच सोई आढळून येतात. दिवसा गाई, हरणे बागडताना दिसतात. पण रात्री बऱ्याच वेळा अस्वल, चित्ते ही आढळून येतात. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार ते कोणालाही उपद्रव करत नाही . रस्त्यात 'माइल स्टोन' नसल्याने
नक्की किती यात्रा बाकी आहे ? याचा अंदाजही येत नाही. एवढ्या अडचणी असल्या तरी येथील सृष्टी सौंदर्य याला तोड नाही. मध्येच झाडांच्या हिरव्या रांगा,तर कधी डोंगर रांगा. जसे जसे वर जाऊ तसे हिमालयाचे होणारे दर्शन, बर्फांच्या वाटेतून मार्गक्रमण ही एक वेगळीच मजा आहे. हिरवे घास,
रंगीबेरंगी फुले ,पक्ष्यांचा मंजुळ किलबिलाट सर्व थकवा विसरायला लावतात. भक्तीच्या शक्तीची जाणीव पदोपदी होते.
मंदिराच्या जवळ येतो तसे घडीव बांधकाम आढळते. मुख्य मंदिराकडे जाताना सर्वात आधी पितृ आधार स्थान लागते. तेथे शिवपार्वती मंदिर आहे . पितरांच्या नावाने येथे दगड रचून ठेवतात.
असे केल्याने पितरांना मोक्षप्राप्ती मिळते अशी धारणा आहे. अजून पुढे गेल्यावर गणेश मंदिर, आकाशगंगा स्थान दिसते . यात एका गुहेतून थेंब थेंब पाणी पडते ते एका कलशात साठवून त्याचा अभिषेक रुद्रनाथास केला जातो. पाण्याचा कलश भरल्यानंतर पाण्याचे थेंब आश्चर्यकारकरीत्या पडण्याचे बंद होतात.
मुख्य मंदिराच्या सरळ रेषेत नारदमुनी मंदिर आहे. रुद्रनाथा प्रमाणेच नारदाची ही मान एका बाजूला वाकडी झालेली दिसून येते. महादेव व नारद संवादासाठी एकमेकांकडे कान करतात असे म्हटले जाते. मंदिर परिसरात पाच पांडव, द्रौपदी व माता कुंती यांचे स्वतंत्र छोटे छोटे मंदिर आढळून येतात.
मुख्य मंदिरात एका ठिकाणी खोल खड्डा आढळतो. त्याबाबत आख्यायिका अशी की, महादेवांचा अपमान झाल्याने दक्ष राजाच्या यज्ञकुंडात सती स्वतःला समर्पित करते , हे वृत्त जेव्हा महादेवांना समजते तेव्हा ते तेथे रागाने आपल्या जटा आपटून भैरवांची निर्मिती दक्ष राजाच्या संहारासाठी करतात.
जटा आपटल्याने झालेला खड्डा आजही स्पष्ट दिसून येतो. 'रुद्र' या शब्दाचा अर्थच संतप्त ,कर्कश्श हा होय. सतीच्या वियोगाने महादेव संतप्त होऊन रुद्र अवतार घेतात म्हणून या स्थानाचे नाव रुद्रनाथ असे आहे.
ऋग्वेदा नुसार रुद्र याचा अर्थ वैद्यकी करणारा असाही होतो वैदिक काळात रुद्र औषधोपचार
करणारास म्हणत असत .
मंदिराच्या बाजूस सरस्वती कुंड आढळून येते या ठिकाणी स्नान करून, सरस्वती देवीची उपासना केल्यास ज्ञानप्राप्ती होते. परिसरात वैतरणा नदी ही आढळून येते. यात पिंडदान केले असता पितरांना स्वर्ग प्राप्ती होते.
ही यात्रा अत्यंत अवघड आहे. मानसिक- शारीरिक कसोट्या पार
करणारी आहे. येथे आल्यावर आत्मिक शांती ,वैराग्य अनुभवण्यास मिळते . यात्रा करण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती, संपूर्ण समर्पण , अर्चित पुण्य , सकारात्मक दृष्टिकोण असल्यास वाट सोपी होते. अनोखे सृष्टीसौंदर्य, हिमालयाची कुशी, शिव सहवास, आंतरिक शांती, कठीण अवघड पण तितक्याच नयनरम्य वाटा
म्हणूनच रुद्रनाथ ला पृथ्वीवरचा स्वर्ग असेही म्हणतात . पण अशा सुंदर निसर्गरम्य स्थानी मानवी हस्तक्षेप आल्यानंतर प्रकृतीची हेळसांड होऊ लागली. प्रकृती म्हणजेच पार्वती , जर आपण प्रकृतीची हेळसांड केली तर शिव तरी कसा प्रसन्न होईल ? म्हणून पृथ्वीवरील प्रकृती सौंदर्य
टिकून राहील यासाठी आपण नक्कीच प्रयत्नशील राहायला हवे.
ही यात्रा एकदा केली तरी तिचा अनुभव नक्कीच आयुष्यभर पुरतो. आपल्या ईच्छित मनोकामना पूर्ती साठी ही यात्रा जरूर करावी
जय बाबा रुद्रनाथ !!!
फोटो साभार गुगल
सौ प्रांजली नवीन कुलकर्णी.

جاري تحميل الاقتراحات...