मनोज सोनवणे बागलाणकर 🚩
मनोज सोनवणे बागलाणकर 🚩

@shivbhakt_M15

17 تغريدة 8 قراءة Sep 02, 2021
#Thread गोडसे यांनी गांधीची हत्या का केली?
हा प्रश्न नेहमीच मनात येतो याचे उत्तर खालील थ्रेड मध्ये🙏
गांधींनी अनेकवेळा छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, गुरु गोविंदसिंग, राणी लक्ष्मीबाई यांना पथभ्रष्ट राष्ट्रभक्त असे म्हटले होते.
(1/n)👇
Part_1
meradeshdoooba.com
अमृतसरच्या १३-एप्रिल-१९१९ रोजीच्या जालियानवाला बाग हत्याकांडात झालेल्या नरसंहाराबद्दल जनरल डायर यांना जबाबदार धरून त्यांच्यावर खटला भरण्यात यावा अशी मागणी संतप्त जनतेकडून झाली. गांधींनी या मागणीस समर्थन देण्यास नकार दिला.
(2/n)👇
१९२१ मध्ये गांधींनी खिलाफत चळवळ आंदोलनास समर्थन दिले तरीही केरळमध्ये मुस्लिमांनी तेथील हिंदूंना मारहाण केली. जवळजवळ २० हजार हिंदूंना ठार मारण्यात आले आणि कितीतरी हिंदूंना बाटवण्यात आले.
inmarathi.com
(3/n)👇
गांधींनी याचा निषेध न करता त्याचे वर्णन 'खुदा 'के बहादूर बंदे' असे केले.
१९२६ मध्ये आर्य समाजाच्या शुद्धीकरण आंदोलनाचे स्वामी श्रद्धानंद यांची हत्या अब्दुल रशीद नावाच्या एका मुस्लिमाने केली. यावर प्रतिक्रिया देत असताना गांधींनी या मुस्लिमाला आपले भाऊ
(4/n)👇
म्हणून त्या मुस्लिमाचे कृत्य योग्य असल्याचे सांगत असतानाच 'आर्य समाजाची शुद्धीकरण चळवळ ही राष्ट्रविरोधी आणि हिंदू मुस्लीम एकतेसाठी घातक' असल्याचे जाहीर केले.
(5/n)👇
भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांना दिलेल्या फाशीमुळे संतापलेली जनता गांधींकडे मोठ्या आशेने पाहत होती.
गांधींनी यात हस्तक्षेप करून त्यांची फाशी टाळण्यासाठी प्रयत्न करावेत. परंतू गांधींनी यांच्या कृत्याला अनुचित हिंसक कार्यवाही म्हणून हस्तक्षेप करण्यास नकार दिला.
(6/n)👇
८- एप्रिल १९२९ रोजी विधिमंडळात भगतसिंग यांनी बॉम्बस्फोट केला. याचा गौरव करण्याच्या ठरावास गांधींनी विरोध केला असला तरीही हा ठराव बहुमताने संमत झाला. गांधींना हा प्रभाव फार जिव्हारी लागला.
पुढे २२-जुलै-१९३१ रोजी वा. भ. गोगटे यांनी हॉटसन याच्यावर गोळीबार केला
(7/n)👇
मात्र बुलेटप्रूफ जाकेट परिधान केले असाल्यामुळे हॉटसन वाचले. गोगटे यांनी केलेले कृत्य हे भगतसिंग यांच्याकडून प्रेरणा घेऊन केले असल्याचे गांधींनी जाहीर केले.
(8/n)👇
या विधानास नेताजी बोस यांनी विरोध करून गांधींना त्यांचे विधान सिद्ध करायचे आव्हान दिल्यावर मात्र बोस हे गांधींच्या नजरेतून उतरले. बोस यांच्या अध्यक्षेखाली १९३९ च्या त्रिपुरा अधिवेशानास गांधी हे अनुपस्थित राहिले.
(9/n)👇
१९३९ च्या काँग्रेसच्या त्रिपुरा अधिवेशनात नेताजी बोस हे बहुमताने निवडून आले होते. मात्र गांधींचा पाठींबा पट्टभी सितारामैय्या यांना असाल्यामुळे गांधींनी बोस यांना सहकार देणे बंद केले. यामुळे सातत्याने होणाऱ्या विरोधामुळे नेताजी बोस यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला.
(10/n)👇
'हिंसेने मिळणाऱ्या आजच्या स्वातंत्र्यापेक्षा अहिंसेने एक सहस्र वर्ष उशिरा मिळणारे स्वराज्य अधिक स्वीकारार्ह आणि श्रेष्ठ असेल' असे मत मांडणाऱ्या गांधींनी जपान विरोधात ब्रिटिशांना सहकार्य केले होते. गांधीनी यावेळी मात्र त्यांच्या अहिंसेच्या तत्वांचा विसर पडला.
(11/n)👇
६-मे-१९४६ ला समाजवादी कार्यकर्त्यांच्या संमेलनाला संबोधित करताना गांधींनी मुस्लीम लीगच्या हिंसेसामोर हिंदूंना आहुती देण्याचे आवाहन केले.
(12/n)👇
केवळ गांधींच्या भावनांचा आदर म्हणून तिरंगा झेंड्यात चरखा असे चित्र काँग्रेसने स्वीकारले आणि सर्व भारतीयांनी ते मान्य केले. यानंतर चरखा असलेला हाच तिरंगा प्रत्येक कार्यक्रमात फिरवण्यात आला.
वीर सावरकरांचाही त्याला विरोध होता.
(13/n)👇
बाकी माहिती पुढील पार्ट मध्ये🙏
संदर्भ: अनिकेत भालेराव लिखित, स्नेहबंध प्रकाशन यांनी एक पुस्तक प्रकाशित केले आहे ज्याचे नाव 'नथुराम गोडसे' असे असून यात सर्व १५० कारणे लिहिली आहेत.
या पुस्तकात पृष्ठ क्रमांक ४९ पासून ही १५० कारणे संक्षिप्तपणे दिली आहेत🙏
(14/n)
Specially Thanks🤗 @SiddhiTheHindu
@NikhilBhamre8
धन्यवाद🙏🚩
त्रिपुरी*

جاري تحميل الاقتراحات...