पाटील™🚩🇮🇳
पाटील™🚩🇮🇳

@patilji_speaks

8 تغريدة 24 قراءة Aug 06, 2021
●◆#SHIV_NARESH देश की वर्दी ◆●
आर.के.सिंग नावाच्या एका खेळाडूला दिल्लीत स्पोर्ट्सवेयर भेटले नाहीत म्हणून दिल्लीतून पटियाला पंजाब येथे जावं लागलं...त्यांना जाणवलं की भारतात स्पोर्ट्स वेयर ते ही कमी किमतीत मिळणं कठीण आहे...आपणच असले कपडे बनविले पाहिजेत.++
आर.के.सिंग यांना दोन मुलं शिव आणि दीपक...बायकोने एकदा सांगितलं की आता मुलं मोठी होत आहेत आपल्याला अधिक पैसे कमवावे लागतील.त्यांच्या पत्नी कुसुमदेवी टेलर काम शिकल्या होत्या.त्यांनी घरीच मशीनवर खेळाडुंचे कपडे शिवायला सुरवात केली.आणि सूर झाला एक कंपनीचा प्रवास त्यानंतर++
1987 साली फक्त 500 रुपये भांडवलावर त्यांनी दिल्लीत शिव नरेश नावाने खेळाडूंसाठी कपडे बनवण्याच्या व्यवसायाची सुरवात केली.कपडे बनवले की सायकल वर बांधायचे आणि जिथे गेम्स चालू आहेत तिथे नेऊन विकायचे.हळूहळू प्रतिसाद मिळत गेला आणि कंपनी मोठी व्हायला लागली.++
1991 साली त्यांचा मुलगा शिव सिंग हे इंजिनिअर त्यात सरकारी नोकरीत होते.त्यांनी नोकरी सोडली आणि From indian,By Indian,To indian हे ध्येय घेऊन शिव सिंग यांनी MD म्हणून कामाला सुरुवात केली.75,000 कोटींच्या इंडीयन स्पोर्ट्स वेयर च्या मार्केट मध्ये ++
जगातील सुप्रसिद्ध स्पोर्ट्स वेयर कंपन्या असताना इथे जम बसवणं कठीण होतंच.पण सुरवातीलाच त्यांनी कोरिया आणि तैवान येथून नवीन मशीन आणि रॉ मटेरियल मागवल आणि कामाला सुरुवात केली.आज कंपनीत 800 कामगार आणि दिवसाला 30,000 स्पोर्ट्स वेयर बनतात.++
शिव नरेश कंपनी आर्मी, एअर फोर्स च्या जवानांना स्पोर्टसवेयर सप्लाय करते.भारतात खेळले जाणारे(क्रिकेट सोडून)सर्व खेळाडू आज शिव नरेश चे स्पोर्ट्स वेयर घालतात.कंपनी त्यांना स्पॉन्सरशिप देते.टोकियो ओलीम्पिक मध्ये सुद्धा पदक जिंकेलेले खेळाडू पाहिले तर त्यांच्या कपड्यावर लोगो दिसतो++
शिव नरेश कंपनी ऍक्टिव्ह स्पोर्ट्स वेयर म्हणजेच खेळाडू मैदानात जे कपडे घालून खेळतो ते कपडे बनवण्यात आघाडीवर आहे...प्रत्येक खेळ आणि त्यानुसार लागणार कापड आणि डिजाईन मध्ये शिव नरेश जगात अव्वल आहे.इतर स्पोर्ट्स वेयर कंपन्या शिव नरेश कंपनीकडून कपडे बनवून घेतात.++
पण आम्हाला puma, adidas, nike हे ब्रँड आवडतात.शिव नरेश चा लोगो समोर आला तर आपलेच लोक नाक मुरडतात.शिव नरेश कंपनीचा ट्रॅक सूट कधी वापरून पहा.बेस्ट क्वालिटी आहे.सर्वांनी आपली भारतीय कंपनी म्हणून या कंपनीचे प्रॉडक्ट घेतले पाहिजेत.
- p@til

جاري تحميل الاقتراحات...