Tushar Lagad Patil 
Tushar Lagad Patil 

@lagadpatil_

13 تغريدة 1 قراءة Aug 03, 2021
#Thread
• छत्रपती शिवाजी महाराज दिसायला कसे होते ?
छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष पाहिलेली अनेक माणसे त्यावेळी होती. पाश्चिमात्यात हेन्री ऑक्झेडन, निकालो मनुची, थेव्हनॉट, उस्टीक, इ. तर भारतीयात परमानंद, परकलदास इ. परंतू फारच थोड्या व्यक्तींनी शिवरायांच्या
१/
व्यक्तिमत्वाबद्दल किंवा शारीरिक ठेवणीबद्दल प्रत्यक्षात नोंद करुन ठेवली आहे.
• महाराजं कसे दिसत होते ?
*इ.स. १६६४ मध्ये सुरतेच्या लुटीच्या वेळी वखारीतल्या इंग्रज अधिकारी एस्केलिऑट याने केलेले वर्णन-
"His personality is described by them , who have seen him , to be of...
२/
...mean stature (medium height) lower some what than i am (when) erect and of an excellent proportion. Actual in exercise ane whenever he speaks seems to smile, a quick and piercing eye and witter than any of his people."
अर्थ-
"छत्रपती शिवाजी राजे आपल्या दक्षिणेकडील...
३/
...इतर मावळ्यांपेक्षा उजळ वर्णाचा असून मध्यम बांध्याचे आहे. त्यांची मान व खांद्याचा भाग पुढे झुकलेला दिसतो; परंतु शरीर मात्र अत्यंत प्रमाणबध्द आहे. कोणतीही गोष्ट नजरेत तत्काळ पकडणारी भेदक दूरदृष्टी हे त्यांचे खास लक्षणीय वैशिष्ट्य आहे."
४/
*इ.स. १६६६ साली फ्रेंच प्रवासी थेव्हनॉट वर्णन करतो-
"This Raja is short and tawny , with quick eyes that shew a great deal of wit. He eats but ones a day commonly and is in good health ."
अर्थ-
"हा राजा ठेंगणा व पिवळसर गौर वर्णाचा आहे. नेत्र तेजस्वी असून बुध्दीमत्तादर्शक...
५/
...आहेत. ते दिवसातून फक्त एकदाच भोजन करतात आणि (तरीही) त्यांची प्रकृती उत्तम आहे."
*इ.स. १६६६ मध्ये राजे आग्र्यात गेले असताना तिथे परकलदास याने राजांना पाहिले. तो लिहितो-
"अर सेवाजी डेल तो हकीर छोटो सो ही देखता दीस जी । अर सुरती बहुत अजाइब गौरो रंग अपुछो राजवी देसौ जी ।...
६/
...हिम्मती मरदानगी ने देखता ही असौ दिसो जू बहुत मरदानो हिम्मतबुलंद आदमी छो । सेवाजी के दाढी छै।"
अर्थ-
"प्रथमदर्शी दिसण्यात छत्रपती शिवाजी राजे हे बांध्याने किरकोळ आहे. पण त्यांचा रंग विलक्षण गोरा आहे. त्यांचे राजतेज असे की कोणीही त्यांना पाहिले की आपोआपच वाटावे की हा...
७/
...राजाचं असला पाहिजे.त्यांची हिम्मत आणि मर्दुमकी पाहिली की हा बुलंद हिमतीचा मर्द माणूस असला पाहिजे असे वाटू लागते.छत्रपती शिवाजी राजांना दाढी आहे."
*कॉस्मा द गार्द या पोर्तुगीजाने केलेले वर्णन(१६९५)-
"With a clear and fair nature had given him the greatest perfections...
८/
...specially that they seemed to dart rays to fire . To these was added a quick, clear and acute intelligence."
अर्थ-
"राजांचा चेहरा मोहक होता. निर्सगाने त्यांना असावी तशी चेहरेपट्टी दिलेली होती. विशेषतः त्यांचे काळेभोर व विशाल नेत्र एवढे तेजस्वी होते की जणू त्यातून...
९/
...अग्निस्फुल्लिंग बाहेर पडत आहेत."
*राज्याभिषेकाप्रसंगी प्रत्यक्ष पाहून इंग्रज वकील हेन्री ऑक्झेडने शिवरायांचे लिहिलेले वर्णन-
"छत्रपती शिवाजी महाराज ४७ वर्षाचे असून देखणे होते. त्यांच्या चर्येवरुन त्यांची बुध्दीमत्ता व चाणाक्षपणा सहज ध्यानात येई. त्यांचा वर्ण इतर...
१०/
...मराठ्यांपेक्षा पुष्कळच गौर होता. त्यांची दृष्टी तीक्ष्ण असून नाक सरळ व बाकदार होते. त्यांच्या दाढीस निमुळतेपणा असून मिशी बारीक म्हणजे विरळ होती. त्यांचे बोलणे निश्चयात्मक, स्पष्ट पण जलद होते."
संदर्भ-
- The English Factory Record
- English Record on Shivaji ...👇
११/
- राजस्थानी पत्रे
- श्री छत्रपती आणि त्यांची प्रभावळ
- भा.इ.सं.मंडळ संमेलनवृत्त

جاري تحميل الاقتراحات...