#Thread
• छत्रपती शिवाजी महाराजांच्या लष्करी शिस्तीचा नमुना असणारे पत्र...
लष्कराची कार्यक्षमता टिकविण्यासाठी शिस्तीची गरज असते. या शिस्तीच्या अभावामुळेच इस्लामी सत्तांचे लष्कर छत्रपती शिवाजी महाराजांपुढे निष्प्रभ ठरले. मुसलमानी सैन्यातील बेशिस्त, दिखाऊपणा नंतरच्या काळात
१/

मराठी सैन्यातही शिरला. त्यामुळे इंग्रज त्यांवर मात करू शकले. सैन्याच्या शिस्तीकरता छत्रपती शिवाजी महाराजांनी काही खास नियम केले होते. त्यांची अत्यंत काटेकोरपणे अंमलबजावणी ते करीत असत. या नियमांचे उल्लंघन करणारा मग तो कोणीही असो शिक्षेतून सुटका नव्हता. या छत्रपती शिवाजी
२/
२/
महाराजांच्या करड्या नियमांमुळे शिस्त राहिली व ते प्रभावी ठरले हे समकालीन साधनांवरून दिसून येतेच. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लष्करी शिस्तीचा एक उत्कृष्ट नमुना म्हणजेच हे पत्र होय.
सदर पत्रातील सर्व शब्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोंडचे आहेत. हे पत्र
३/
सदर पत्रातील सर्व शब्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोंडचे आहेत. हे पत्र
३/
छत्रपती महाराजांनी सांगितले आणि बाळाजी आवजीने लिहिले. त्यामुळे या पत्राची भाषा कारकुनी नसून साहेबी आहे. स्वराज्याच्या शिपाई लोकांनी अमुक रितीने का वागावे आणि अमुक रितीने का वागू नये ह्याची फोड छत्रपती शिवाजी महाराजांनी शिपायांस करून दाखविली आहे. सदर पत्र केवळ आज्ञापत्र
४/
४/
नाही. पत्रात जरब दाखविली आहे. परंतु ती शिपायांच्या हिताची आहे असे शिपांयांना आतील मजकूर वाचून वाटावे असा या पत्राचा रोख आहे. हा हुकूम कारकूनाचा नसून खुद्द साहेबाचा म्हणजेच छत्रपतींचा असल्याने सैनिकांच्या आदरास तो विशेष प्राप्त झाला असेल हे उघड आहे.
५/
५/
पत्रात छत्रपती शिवाजी महाराज चिपळूण जवळ पागेचा तळ पडला असता अधिकारी आणि सैन्याने कसे वागावे यासंबंधी १९ मे १६७३ रोजी लिहिलेल्या पत्रात महाराज सांगतात :
“.......... कितेक दिवस उपाशी मरायला लागतील म्हणजे त्याला ऐसे होईल की मोगल मुलकांत आले त्याहुन हि अधिक तुम्ही! ऐसा
६/
“.......... कितेक दिवस उपाशी मरायला लागतील म्हणजे त्याला ऐसे होईल की मोगल मुलकांत आले त्याहुन हि अधिक तुम्ही! ऐसा
६/
तळतळाट होईल! तेव्हा रयतिची व घोड्यांची सारी बदनामी तुम्हावर येईल. हे तुम्ही बरे जाणून शिपाई हो अगर पावखलख हो, बहुत यादी करून वर्तणूक करणे. कोण्ही पागेस अगर मुलकांत गावोगाव राहिले असाल त्यांणी रयतेस काडीचा आधार द्यावयाची गरज नाही........”
७/
७/
संदर्भ -मराठ्यांच्या इतिहासाची साधने खं-८ लेख-२८
या पत्रावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील शिस्त, राज्यप्रमुखाचा अधिकारी आणि सैन्यावर असलेला जरब आणि रयतेप्रती असलेली आपुलकी या गोष्टींची प्रचिती येते.
- संकेत पगार
या पत्रावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील शिस्त, राज्यप्रमुखाचा अधिकारी आणि सैन्यावर असलेला जरब आणि रयतेप्रती असलेली आपुलकी या गोष्टींची प्रचिती येते.
- संकेत पगार
جاري تحميل الاقتراحات...