Devashish Kulkarni
Devashish Kulkarni

@AjaatShatrruu

5 تغريدة 7 قراءة Aug 08, 2021
🔶पुण्यश्लोक शाहूछत्रपती आणि ‘त्यांचा’ नाना (नानासाहेब पेशवा):
१७४६ मध्ये काही कपटी लोकांनी नानासाहेब पेशव्यांच्या विरोधात शाहूछत्रपतींचे कान फुंकले.
नानासाहेबांनी ब्राह्मणाचे हात तोडले, ते दारु पिऊन धुंद असतात असं सांगून महाराजांमध्ये आणि नानासाहेबांमध्ये वितुष्ट आणलं.
१/४
शाहूछत्रपतींनी या सगळ्याचा बारकाईने शोध घेण्यासाठी शेटी मलीकास पुण्यास पाठवले.
शेटी मलीक ने महाराजांना सांगितलं की हे सगळं ‘बाष्कळ’ आहे.
त्यावरुन पुण्यश्लोक शाहूछत्रपती बोलले की -
“लवंडीचे लोक भलतेंच सांगतात. सर्व लटकें! नाना खुशाल आहे कीं?”
२/४
तेव्हा शेटी ने महाराजांना सांगितलं कीं खुशाल आहेत.
महाराज बोलले, “इतकेंच असलें म्हणजे जाहलें. नाना जिवानें खुशाल असला म्हणजे सर्व बरें आहे. लोकांचे आम्ही मजकूर कोठें मानतों? तू (शेटी मलीक) सांगतोस हें खरें. 🔶बारांना वाईट नाना माझा तेवढा चाकर पदरीं माझे मातवर आहे.🔶…
३/४
…सुखरुप असला म्हणजे जाहलें.”
संदर्भ: ऐतिहासिक पत्रव्यवहार (रियासतकार सरदेसाई)
ह्या पत्रावरुन शाहूछत्रपतींचा नानासाहेबांवर किती जीव होता हे साफ कळून येतं.
नानासाहेबांनी महाराजांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला नाही. नेहमी स्वामीनिष्ठा काय असते हे सगळ्यांना दाखवून दिलं.
४/४

جاري تحميل الاقتراحات...