Devashish Kulkarni
Devashish Kulkarni

@AjaatShatrruu

23 تغريدة 31 قراءة Aug 08, 2021
#Thread : श्रीमंत बाळाजी बाजीराव तथा नानासाहेब : राजकारणी धुरंधर - मुत्सद्दी पेशवा (१७४०-१७६१)
आज नानासाहेबांची २६० वी पुण्यतिथी. त्यांच्या पुण्यस्मृतिस त्रिवार वंदन💐🙏🏼
प्रतापसूर्य थोरले बाजीराव यांचे थोरले चिरंजीव नानासाहेब यांचा जन्म १६ डिसेंबर, १७२१ रोजी झाला.
१/२१
वडिल सतत मोहीमांवर असल्यामुळे लहानपणा पासूनंच चिमाजी अप्पांसोबत साताऱ्याच्या दरबारातलं राजकारण हे नानासाहेबांनी अनुभवलं होतं.
स्वत:ला अभिमानाने शिवछत्रपतींचे शिष्य म्हणवून घेणारे आणि खुद्द पुण्यश्लोक शाहूछत्रपतींच्या तालमीत तयार झालेले नानासाहेब एक धुरंधर राजकारणी होते.
२/२१
थोरल्या बाजीरावांच्या मृत्यूनंतर नागपूरच्या रघुजी भोसल्यांनी पेशवेपदासाठी बाबूजी नाईकांच्या नावाची शिफारस केली होती.
तरी देखील छत्रपती शाहू महाराजांनी ती फेटाळून नानासाहेबांना २५ जून, १७४० रोजी ही👇🏼आज्ञा करुन पेशवाईची वस्त्रे प्रदान केली.
३/२१
पुण्यश्लोक शाहूछत्रपतींचा नानासाहेबांवर फार जीव होता.
पेशवाईची वस्त्रे देताना महाराजांनी सर्व मराठा सरदारांना नानांना सांभाळून घेण्याची आज्ञा केलेली.
संदर्भ:
🔸The Extraordinary Epoch of Nanasaheb Peshwa (Dr. Uday Kulkarni)
🔸थोरले शाहू महाराज यांचे चरित्र (का. ना. साने)
४/२१
१७४६ मध्ये काही कपटी लोकांनी (रघोजी भोसले, यमाजी शिवदेव) महाराजांचे कान फुंकले आणि नानासाहेबांना पेशवे पदावरुन दूर केलं.
पण तरी देखील नानासाहेबांची स्वामीनिष्ठा तसूभरही कमी झाली नाही.
गोविंदराव चिटणीस यांना लिहीलेल्या या पत्रातून नानासाहेबांची स्वामीनिष्ठा साफ दिसून येते.
५/२१
१७४९ साली आपल्या मृत्यूपत्राद्वारे पुण्यश्लोक शाहूछत्रपतींनी स्वदस्तुरीच्या दोन याद्या देऊन मराठा साम्राज्याची जबाबदारी नानासाहेबांवर सोपवली होती.
या दोन याद्या वाचून शाहूछत्रपतींचा नानासाहेबांवर किती विश्वास होता, हे साफ कळून येतं.
६/२१
पुण्यश्लोक शाहूछत्रपतींच्या मृत्यूनंतर महाराणी सकवारबाई ह्यांनी आशीर्वाद म्हणून नानासाहेबांना महाराजांचे कानातले पाठवले होते.
स्वामीनिष्ठा व्यक्त करण्यासाठी नानासाहेबांनी पर्वतीवर शाहूछत्रपतींच्या पादुकांची प्रतिष्ठापना केली होती.
संदर्भ: बाळाजी बाजीराव रोजनिशी
७/२१
अशा ह्या स्वामीनिष्ठ पेशव्यावर इतिहासाचं विकृतीकरण करणारे काही #बाजारु_विचारवंत कपटाचे आरोप करतात.
१७५० मध्ये पण छत्रपती रामराजा यांना भडकवायचं काम काही कपटी लोकांनी केलेलं.
पण छत्रपती रामराजांसाठी नानासाहेब काय होते ते या पत्रावरुन स्पष्ट कळून येतं.
८/२१
जर नानासाहेबांनी कपटाने शाहूछत्रपतींचं राज्य बळकटवलं असतं तर फत्तेसिंह बाबा (शाहूछत्रपतींचे मानस-पुत्र), रघोजी भोसले, मल्हारराव होळकर, जयप्पा शिंदे या सारख्या सरदारांनी त्यांची साथ का दिली असती?
याच संदर्भातली काही महत्त्वाची समकालीन पत्रे पाहूयात.
९/२१
🔸फत्तेसिंह बाबा आणि नानासाहेब
“हे दौलत व आम्हीं आपले आहों हा भरवसा आपणास असों द्यावा....”
- अक्कलकोटकर फत्तेसिंह भोसले (पुण्यश्लोक शाहूछत्रपतींचे मानस-पुत्र)
१०/२१
🔸रघोजी भोसले आणि पेशव्यांमधला वाद काही नवीन नाही. पण शाहूछत्रपतींच्या मृत्यूनंतर जो काही सत्ता-संघर्ष झाला त्यात रघोजी भोसले हे नानासाहेबांच्या बाजूने तटस्थ उभे होते.
“आम्ही तर ज्याप्राो राजश्रीची पूर्वी नि:कपट चाकरी केली त्याप्राो राा पेशवियांची करुं”- ह्यातंच सगळं आलं.
११/२१
बाबूजी नाईक जेव्हा मल्हारराव होळकर यांना नानासाहेबांच्या विरोधात फितवायला गेले होते तेव्हा तर मल्हाररावांनी त्यांची चांगलीच कान-उघडणी करुन त्यांना घरा बाहेर हकललेले.
ही होती मल्हाररावांची स्वामीनिष्ठा.
१२/२१
🔸महाराणी ताराबाई आणि श्रीमंत नानासाहेब पेशवे
पुण्यश्लोक शाहू छत्रपतींच्या मृत्यूनंतर सत्ता-संघर्षाच्या वेळी ताराराणी आणि नानासाहेब यांच्यात झालेला वाद सर्वश्रुत आहे.
ह्या वादावरुन काही कपटी लोक छत्रपती-पेशवे घराण्यात नसलेले वाद रंगवून सांगतात.
पण खरंच एवढे वाद होते का?
१३/२१
महाराणी ताराबाईंनी १७५० मध्ये जेव्हा छत्रपती रामराजा ह्यांना कैद केलेलं तेव्हा नानासाहेबांनी पुरंदरे यांना लिहीलेल्या पत्रातून त्यांच्या मनामधला ताराबाईंसाठीचा आदर साफ दिसून येतो.
यात पत्रातून नानासाहेबांची स्वामीनिष्ठा पुन्हा दिसून येते.
१४/२१
१७५७-५८ सालाचा हे पत्र अटक मोहिमेच्या आधीचं आहे.
ह्या पत्रातून महाराणी ताराबाईंना नानासाहेबांच्या धोरणांवर किती विशिवास होता हे साफ दिसून येतय.
१५/२१
“राज्यभराचा अखत्यार तुझांवरच आहे. तुझांपेक्षा दुसरा सेवक उपयोगी सांप्त कालीं कोण? सर्व राज्यभराचें कामकाज तुमचेच हातें घ्यावें, हेंच साहेबांचें मानस. एतदर्थी चित्तांत किमणू संशय न धरणें”.
- महाराणी ताराबाई यांचं नानासाहेब पेशवे यांना पत्र (१७५७-५८)
१६/२१
नानासाहेबांच्या राजकारणामुळे आणि इतर मराठा सरदारांच्या शौर्यामुळे शिवछत्रपतींचा जरी पटका लाहोर, पेशावर च्या पलिकडे अटकच्या किल्ल्यावर फडकला.
पुणे हे हिंदुस्तानाच्या राजकारणाचे केंद्र बनले.
नानासाहेबांच्या काळात पुणे ऐश्वर्यसंपन्न बनले.
१७/२१
पुण्याच्या लकडी पुलाचे काम नानासाहेबांनी सुरु केले आणि आपल्या देखरेखीखाली पूर्ण करुन घेतले होते.
पाणीपुरवठा ही एक मोठी समस्या होती. त्यांनी प्रत्यक्ष कात्रजला जाऊन तिथलं पाणी पुण्यास आणण्याचा निश्चय केला.
नागरिकांच्या सुरक्षिततेकडे त्यांनी लक्ष पुरविले होते.
१८/२१
आपल्या प्रजेचे पालन करण्याचा सतत उद्योग त्यांनी केला.
प्रजेवर कसल्याही प्रकारची जुलुमजबरदस्ती त्यांनी केली नाही. आपल्या राज्यात सौख्य व शांती नांदावी यासाठी ते झटत असल्याने, प्रजा त्यांना नेहमी धन्यवाद देत असत.
१९/२१
पानिपतानंतर बंधू आणि पुत्र शोकात नानासाहेबांनी २३ जून १७६१ रोजी पर्वती वर अखेरचा श्वास घेतला.
काय योगा-योग आहे ते पहा. महाराणी ताराबाईंनी याच दिवशी नानासाहेबांसाठी मुरंबा आणि आंबे पाठवलेले.
मातुश्रींना स्वप्नात पण वाटलं नसेल कि असं काहीतरी अनिष्ट घडेल.
२०/२१
कोल्हापूरच्या समकालीन असणाऱ्या रघुनाथ यादव यांनी त्यांच्या ‘बखर पानिपत ची’ यात नानासाहेबांचे शेवटचे शब्द टिपले आहेत.
स्वामीनिष्ठा, स्वाराज्याचं आणि रयतेचं हित - नेहमी हेच होतं नानासाहेबांच्या मनात.
अशा पुण्यातम्यास विनम्र अभिवादन💐🙏🏼
२१/२१
@threader_app pls unroll
Unroll @rattibha

جاري تحميل الاقتراحات...