Devashish Kulkarni
Devashish Kulkarni

@AjaatShatrruu

11 تغريدة 480 قراءة Aug 08, 2021
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर...
नेहमी ‘हिंदुपदपादशाही’ यातील ‘हुतात्मा छत्रपति’ चा SS वापरुन सावरकरांवर ताशेरे ओढण्याचा केविलवाणा प्रयत्न #बाजारु_विचारवंत यांच्याकडून केला जातो.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ‘हिंदुपदपादशाही’ १९२८ साली लिहीलं.
१/१०
१९२८ साली छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर किती संशोधन झालं होतं या कडे दुर्लक्ष करुन सावरकरांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं.
फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतले विचारवंत आणि इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार याबद्दल काय म्हणतात ते नक्की वाचा👇🏼
संदर्भ - छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ
२/१०
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १९२८ मध्ये जेव्हा ‘हिंदुपदपादशाही’ लिहीलं त्यावेळेला बखरींपलिकडे काही साधनं उपलब्ध नव्हती.
सावरकरांनाही बखरींच्या द्वारे प्रस्तृत झालेले शंभूचरित्र ज्ञात होते.
आणि बखरकार आणि धर्मवीर शंभूराजे याबद्दल आपल्याला सत्य माहीतंच आहे.
३/१०
वा.सी.बेंद्रे लिखीत ‘छत्रपती संभाजी महाराज’ हे शंभूचरित्र १९६० साली प्रकाशित झालं आणि या हुतात्मा छत्रपतीवर संशोधनला एक नवी दिशा मिळाली.
बेंद्रे यांचंच कार्य पुढे नेणाऱ्या आणि स्वत:च्या डॉक्टरेट पदवीच्या प्रबंधासाठी ‘छत्रपती संभाजी’ हा विषय निवडणाऱ्या डॉ.सौ.कमल गोखलेंनी...
४/१०
...’शिवपुत्र संभाजी’ हे शंभूचरित्र १९७१ साली पूर्ण केलं.
पण ‘शिवपुत्र संभाजी’ हे पुस्तक लिहायला डॉ.कमलताई गोखले यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी प्रोत्साहित केलेलं हे किती लोकांना माहितीये?
शंभूराजेंवर अधिक संशोधन झालंच पाहिजे ही सावरकरांची भावना होती.
५/१०
१९६९ साली कमलताई यांचे पती श्री.पु.गोखले यांनी लिहीलेल्या ‘सावरकरांशी सुखसंवाद’ या पुस्तकात त्यांनी या सर्व गोष्टी नमूद केल्या आहेत.
या वरुन हे साफ दिसून येतं की स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मनात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल किती आदर होता.
६/१०
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या हौतात्म्याबद्दल बोलायला सावरकरांनी कधीही मागे पुढे बघितलं नाही.
अगदी १९२८ मध्ये लिहीलेल्या हिंदुपदपादशाहीत पण शंभूराजेंच्या बलिदानाला सावरकरांनी आदरांजली वहायली होती.
डॉ.जयसिंगराव पवार यांनी देखील हे नमूद केलेलं आहे.
७/१०
दुर्दैवाने डॉ.कमलताई गोखले यांचे शंभूचरित्र सावरकरांना वाचता आले नाही.
कारण त्यांनी १९६६ सालीच देह ठेवला होता.
बेंद्रे आणि गोखले यांच्या कार्याची प्रशंसा तर दूरंच, पण शंकरराव सावंत यांच्या सारख्यांनी तर त्यांच्यावर नको-नको ते ताशेरे ओढले.
८/१०
स्वातंत्र्यवीर सावरकरांना बदनाम करणारे बाजारु विचारवंत, शंकरराव सावंत यांच्या ‘हुतात्मा संभाजी’ वर मात्र मूग गिळून गप्प राहतात.
असो, कोणावर ही ताशेरे ओढण्याआधी सगळी पार्श्वभूमी जाणून घेतलीच पाहिजे.
बाजारु विचारवंतांना स्वातंत्र्यवीर सावरकर कळावेत अशी मुळीच अपेक्षा नाही!
९/१०
संदर्भ:
१) हिंदुपदपादशाही (स्वातंत्र्यवीर सावरकर)
२) छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ (डॉ.जयसिंगराव पवार)
३) सावरकरांशी सुखसंवाद (श्री.पु.गोखले)
SS साठी @accountanthunbc याचे आभार.
१०/१०
Unroll @rattibha

جاري تحميل الاقتراحات...