ShriRaj Tripute
ShriRaj Tripute

@ShriRajTripute_

21 تغريدة 128 قراءة May 26, 2021
#मोदी_आणि_मोसादेग
#भारत_आणि_ईराण
ईराण भारताला खूप मोठ्या प्रामाणात तेल निर्यात करतो म्हणून जेव्हा जेव्हा ईराण-अमेरिका संघर्ष वाढतो त्याचा प्रभाव भारतावरही पडतो, आपली मिडिया खूप प्रमाणात त्या संदर्भात बातम्या दाखवत असते.
तुम्ही कधी विचार केला आहे का की "ईराणी लोकं अमेरीकेला-
"सैतानाचा देश" का म्हणतात?"
इराणच्या तेल व्यापारावर UK चं वर्चस्व होतं, इराणच्या तेल उत्पन्ऩातला 84% भाग हा UK ला मिळत होता व फक्त 16% इराणला
इराणचा बादशाह मोहम्मद रझा पहलवी एक भ्रष्ट असल्याने त्याला याने घंटा फरक पडत नव्हता.
(इराणमध्ये घटनात्मक राजेशाही होती,घटनात्मक शाहीत-
निवडणूका,संसद ईत्यादी ही असतात.)
1951मध्ये मोहम्मद मोसादेग हा कट्टर देशभक्त व्यक्ती PM झाला, इराणच्या तेल व्यापारावर विदेशी कंपन्याच असलेलं वर्चस्व त्याला आवडत नव्हते. 15/3/51 रोजी इराणच्या तेलउद्योगाचे राष्ट्रीयकरण करण्याचे विधेयक त्याने संसदेत सादर केले, ते बहुमताने संमत झाले.
हे विधेयक संमत झाल्यावर इराणी लोकांनी सुखाची स्वप्ने पहायला सुरवात केली की आता आपली गरीबी दूर होईल असं त्यांना वाटाय लागलं.
टाईम मॅगजीन ने मोसादेग ला 1951 चा "Man of the year" म्हटलं.
पण या सर्व गोष्टींमुळे ब्रिटिशांचं खूप नुकसान झालं.
ब्रिटिशांनी मोसादेग ला हटवण्यासाठी अनेक-
छोटे मोठे प्रयत्न केले मोसादेगला लाच देण्याचा प्रयत्न केला, मोसादेगचा खून करण्याचा प्रयत्न केला, लष्करी उठावाचे प्रयत्न केले पण मोसादेग हा अत्यंत अनुभवी व हुशार असल्याने इंग्लंडचे खून, लाच हे कट अयशस्वी झाले व त्यात इराणी जनतेमध्ये मोसादेग प्रचंड लोकप्रिय असल्याने लष्करी उठाव ही-
शक्य झाला नाही.
शेवटी ब्रिटिशानी अमेरीकेकडून मदत मागितली.
अमेरीकेच्या CIA ने मोसादेग ला हटवण्यासाठी 10 लाख डॉलर्सचा निधी मंजूर केला
10 लाख डॉलर म्हणजे 4250 कोटी रियाल (ईराणी चलन)
तेहरान (ईराण राजधानी) मधल्या अमेरीकन राजदूताला हा निधी पाठवण्यात आला.
मोसादेगला इराण मधील राजशाही-
पूर्णपणे संपवून संसदेकडे सर्व बळ द्यायचं होतं म्हणून इराणचा बादशाह सुद्धा UK व USA बाजूने होता.
त्यांचा प्लॅन असा होता की मोसादेग विरूद्ध असंतोष निर्माण करून त्याला असलेला जनतेचा पाठिंबा काढून घ्यायचा मग लाचखोर संसद सदस्यांच्या मदतीने त्याचं सरकार पाडायचं.
मोठ्या प्रमाणात इराणी पत्रकार संपादक,मुस्लिम धर्मगुरू व इत्यादीना अमेरीकेने 631 कोटी रियाल वाटले.
आणि त्या पत्रकार,संपादक व मुस्लिम धर्मगुरूंना याबदल्यात एकच काम करायचं होत ते म्हणजे जनतेला मोसादेग विरूद्ध भडकवायचं होत. मोसादेगच्या कामाविषयी अपप्रचार करण्यासाठी इराणी संसदेतल्या-
सदस्यांना प्रत्येकी 46 कोटी रियाल देण्यात आले.
हजारो इराणी लोकांना खोट्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायला पैसे वाटण्यात आले.संसदेवर मोर्चा काढायला सुरवाती झाल्या.
जगभरातील मोठ्या प्रसार माध्यमांनी देखील अमेरिकेला साथ द्यायला सुरवात केली.
"न्यूयॉर्क टाइम्स" मध्ये मोसादेग चा उल्लेख "हुकूमशाह" असा व्हायला लागला, "टाइम" मॅगजीन ने मोसादेगची झालेली निवड धोकादायक असल्याचं सांगितलं.
मोसादेग विरोधात अत्यंत हिन पातळीवरून विरोध व्हायला लागला,त्याला समलिंगी दाखवत व्यंगचित्रे छापण्यात आली.
लाचखोर खासदारांद्वारे आपलं सरकार पाडलं जाणार आहे हे मोसादेग ला कळल्यामुळे त्याने संसदच बरखास्त केली,शेवटी USA ने इराणच्या बादशाहला मोसादेगला PM पदावरून काढण्यासाठी आदेश काढायला लावलं.आदेश स्विकारण्याचे किंवा नाकारण्याचे अधिकार मोसादेग कडेच असल्याने,आदेश नाकारताच त्याला अटक करायच-
ठरलं.पण मोसादेगच्या सैनिकांनी अटक करायला आलेली सैन्य तुकडीच अटक केली व हे कळताच इराणचा बादशाह बगदादला पळून गेला.
शेवटी 210 कोटी रियालची लाच देऊन USAने तेहरान मध्ये नकली दंगे भडकवले,दोन्ही पक्षाची लोकं भाडोत्री होती.
दंगेखोरांनी मोसादेगच्या घरावर हल्ला केला मोसादेगला पळ काढावा-
लागला.लष्कराने सत्ता उधळून लावली,बादशाहच्या जून्या आदेशाचा दाखला घेत एक बाहुला व्यक्ती पंतप्रधान पदी बसला.
बादशाह पुन्हा इराणला परतल्यानंतर मोसादेग शरण आला,त्याच्यावर खटला टाकून त्याला तुरूंगात टाकण्यात आलं व त्यानंतर त्याला मरेपर्यंत नजरकैदेत ठेवण्यात आले.
85 वय असताना मोसादेगचा नजरकैदेतच मृत्यू झाला.
यानंतर USA व UK ने इराणी तेलाचा 40%-40% भाग वाटून घेतला व इतर 20% भाग ईतर युरोपीयन कंपन्यांना देण्यात आला.
अनेक दशके इराणी लोकांना बादशाहच्या तानाशाहीत काढावी लागली,एका क्रांती नंतर राजशाहीचा अंत झाला पण नंतर धर्मांध खोमेनी सत्तेवर-
आला आणि त्याच्यामुळे तर इराणी जनतेचे आणखीन हाल झाले.
मोसादेगचा गुन्हा काय होता? "आपल्या देशातील क्षेत्रांवर विदेशी कंपन्यांच्या जागी स्वदेशी कंपन्याचं वर्चस्व असावं!" हे धोरण म्हणजे त्याचा गुन्हा?
मोसादेगच्या नेतृत्वात 1955 च्या आधीच ईराण पुर्णपणे लोकतांत्रिक देश झाला असता व तेल-
उत्पादनाचा 100% लाभ इराणलाच झाला असता.अनेक दशके इराणी लोकांवर जो अत्याचार झाला तो ही झाला नसता.
प्रबळ लोकतंत्र व स्वदेशी कंपन्यांना प्राधान्य देणाऱ्या सरकारमुळे कदाचित इराण आज सौदी अरेबियापेक्षा जास्त समृद्ध देश असता.
पण इराणच्या भ्रष्ट खासदार,पत्रकार,संपादक आंदोलनजीवी इत्यादी-
लोकांनी इराणचं समृद्ध भविष्य फक्त १० लाख डॉलर्सला विकून टाकलं.
अत्याचाराच्या या काळात इराणी लोकांना कळायला लागलं की मोसादेगचं सरकार पाडण्यात USA चा हात होता.
1979 मध्ये इराणी लोकांनी US दुतावासातील लोकांना 444 दिवस बंदी बनवून ठेवल, इराणी लोकांना दुतावासमध्ये जी कागदपत्रे मिळाली-
त्या कागदपत्रांचे 77 खंड प्रसिद्ध करण्यात आले ज्यात अमेरिकेने इराण मधल्या अत्याचारी बाहुल्यांना कशाप्रकारे मदत केली याचे पुरावे होते,म्हणुनच इराणी लोकं अमेरिकेला "सैतानाचा देश" म्हणतात.
विदेशी कंपन्यांचं वर्चस्व मोडून स्वदेशी कंपन्याना वाढवणे हे धोरण मोसादेगला पूर्ण करता आल नाही,
जगाच्या दोन महासत्तांशी त्याने वैर स्विकारलं होतं शेवटी त्याचा दुर्दैवी अंत झाला,बॉलीवुड चित्रपटांप्रमाणे प्रत्येकवेळी नायकाचा विजय होत नसतो.
शेवटी इराणसाठी खरे खलनायक कोण..? अमेरिका की विकले गेलेले पत्रकार,संपादक,खासदार,आंदोलनजीवी ?
जर ही लोकं विकली गेली नसती तर जनता-
मोसादेगच्या पाठीशी जनता उभी असती,इंग्लंड प्रमाणे अमेरिकेलाही यश मिळाल नसतं.पण चार पैशांसाठी देशप्रेमी नेत्याला "हुकूमशाह" म्हटलं व बघता बघता संपूर्ण देश उध्वस्त झाला.
आता हीच परिस्थिती आत्मनिर्भर भारत अभियानानंतरची भारतातील CAA सारखी बेसलेस आंदोलने, अवाॅर्डवापसी , मिडीया हाऊसेस-
यांच्याशी कंपेअर करुन पहा.
समजेल भारतासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे का गरजेचे आहेत.

جاري تحميل الاقتراحات...