Devashish Kulkarni
Devashish Kulkarni

@AjaatShatrruu

21 تغريدة 12 قراءة Aug 08, 2021
#Thread: Renaissance State
इतिहासाचं विकृतीकरण काही महाराष्ट्रासाठी नवीन नाही. अनेक महापुरुषांच्या इतिहासाचं विकृतीकरण गेले अनेक दशकं सुरु आहे.
@girishkuber यांच्या या👇🏼 पुस्तकावरुन पुन्हा एक जूना वाद पेटला आहे.
आज कुबेर यांनी मांडलेल्या काही प्रमुख मुद्यांचं खंडण करतोय.
१/२०
🔸 बखरकार/इतिहासकार/कादंबरीकार आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज.
बखरकारांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कधी कळलेच नाही. काहींनी मुद्दामून त्यांना बदनाम केलं.
दोन बखरकारांनी शंभूराजेंची बदनामी केली - कृष्णाजी अनंत सभासद (ब्राह्मण) आणि मल्हार रामराव चिटणीस (चं.का.प्रभू).
२/२०
इथे या दोघांची जात नमूद का केलीये ते पुढे कळेलंच.
मल्हार रामराव चिटणीसाचे लिखाण पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून केलेले आहे हे तर सर्वश्रुत आहे.
सभासद आणि चिटणीस बखरीमध्ये शंभूराजेंच्या केलेल्या नालस्तीबद्दल डॅा.जयसिंगराव पवारांचं मत👇🏼
३/२०
पण सभासद आणि चिटणीस या दोघांनी शंभूराजेंची बदनामी केली म्हणून सगळ्या ब्राह्मणांना आणि चं.का.प्रभूंना शिव्या देऊन नाही चालणार.
कारण धर्मवीर शंभूराजेंचा ‘खरा इतिहास’ लोकांसमोर यावा यासाठी आपलं आयुष्य वेचणारे वा.सी.बेंद्रे आणि डॅा.कमलताई गोखले हे पण चं.का.प्रभू/ब्राह्मण होते.
४/२०
कोण कुठला लेखक काहीतरी लिहीतो आणि स्वत:ला ‘सुजाण’ दाखवणारे #बाजारु_विचारवंत दोन समाजांमध्ये आग लावण्याचा प्रयत्न करतात हेच या महाराष्ट्राचं दुर्दैव.
मला कुबेर यांची जात माहिती नाही. पण B-ग्रेडी बाजारु विचारवंतांच्या कमेंट्सवरुन ते ब्राह्मण आहेत असं वाटतय. असतीलही.
५/२०
B-ग्रेडी बाजारु विचारवंतांनी लगेच गिरीश कुबेरांना अनाजी चा वारस ठरवलं.
अनाजी पंताचाच का? तो गद्दार होता लेखक नाही.
मंबाजी भोसले, नागोजी माने, चंद्रराव मोरे, नाईकजी पांढरे, कल्याणजी यादव, पिलाजी व शंकराजी मोहिते, बाजी घोरपडे यांचा का नाही?
गद्दारी काय एकानेच केलेली का?
६/२०
तसं तर मग ‘हुतात्मा संभाजी’ या पुस्तकात शंकरराव सावंत यांनी जी शंभूराजेंची बदनामी केलीये त्यावर हे बाजारु विचारवंत काय म्हणणार?
सावंतांनी तर शंभूराजेंचा खरा इतिहास मांडणाऱ्या बेंद्रे आणि गोखले यांच्यावर पण नाही नाही ती टीका केलेली.
७/२०
बखरकारांच्या लिखाणावर आवलंबून राहणारे इतिहासकार पण बदनामीकरणाला कारणीभूत आहेत.
मुळात धर्मवीर शंभूराजेंवर जितकं संशोधन होयला हवं होतं तेवढं कित्येक वर्ष झालंच नाही.
इतिहासकारांकडून त्यांची बदनामी का झाली याच्या कारणांकडे दुर्लक्ष करुन नाही चालणार.
८/२०
माझ्या मते मुंबईकर इंग्रजांचं हे पत्र सगळ्या बदनामीकरणाचे मूळ आहे.
समकालीन असणाऱ्या फ्र.मार्टिन (फ्रेंच), खाफी खान (मोगल) या शत्रूंनी देखील शंभूराजेंची अशीच बदनामी केली.
पुढे जदुनाथ सरकार, सुरेंद्रनाथ सेन या सारख्या इतिहासकारांनी हीच साधनं वापरुन शंभूराजेंवर लिखाण केलं.
९/२०
कादंबरीकारांनी याच साधनांचा वापर केला.
मुळात इतिहासकारांचा शत्रूच्या साधनांवर जास्तं भार पडला हेच चूकलं.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास लोकांसमोर मांडला तो वा.सी.बेंद्रे आणि डॅा.कमलताई गोखले ह्यांनी.
१०/२०
धर्मवीर संभाजी महाराजांबद्दल बोलावं तितकं कमीच.
थोडक्यात शंभूराजे कसे होते या साठी केशव पंडितांच्या काही ओळी पूरेशा आहेत.
महाराजेन पिश्रास्य घातुकेन महीभृताम।
श्रीशिवछत्रपतिना सिंहासन निषेदुष्णा॥
संभाजीकेन च भ्राता ज्वलज्ज्वलनतेजसा
विलुंठितेषु सर्वेषु पौरजानपदेषुच॥
११/२०
🔸पुण्यश्लोक शाहूछत्रपती
श्री कुबेरांचं असं मत आहे कि छत्रपती शाहू महाराजांकडे ‘दूर्दृष्टि चा अभाव होता’.
आता यावर काय बोलावं🤦🏻‍♂️
दूर्दष्टि चा अभाव असणारे पुण्यात्मा ‘हिंदुपदपादशाह’ झाले असते का🤷🏻‍♂️
असो, कुबेरांना मी अवगत करवून देतो - पुण्यश्लोक शाहूछत्रपतींची दूर्दृष्टि.
१२/२०
नानासाहेबांना पेशवाईची वस्त्रे देताना राजश्रींनी नानासाहेबांना केलेली आज्ञा त्यांच्या दूर्दृष्टिचं एक उत्तम उदाहरण आहे.
“अटकेपार घोडे चालवावे”. आणि १७५८ मध्ये मराठ्यांचे घोडे अटकेपार चालले!
पुण्यश्लोक शाहूछत्रपतींच्या उत्तम राजकारणाची ओळख करवून देणारी अशी अनेक पत्र आहेत.
१३/२०
Tīn-Chār Laksha (Lakhs) Faujecha Pātshāhā āmchā Pātshāhā Chattrapati (Shahu) Mahārāj!
Tyānchā Jaye va Pratāp āmche mastaki astāt!
Sarva Prithvichā jaye sampādito va ājbar sampādit ālo āhot! Tumchā tamā dharito yese nāi!
- १७६० मध्ये भाऊसाहेबांचे उद्गार (पानिपतची बखर)
१४/२०
🔸शिवछत्रपती आणि थोरले बाजीराव पेशवे
#RenaissanceState या पुस्तकात कुबेर यांनी थोरल्या बाजीराव पेशव्यांची तुलना शिवछत्रपतींसोबत केली आहे.
मी आजवर अनेक वेळेला ही गोष्ट स्पष्ट केली आहे - कोणाचीही तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत केली जाऊ शकत नाही!
१५/२०
कुबेर यांच्या पुस्तकाचं खंडण या👇🏼महाशयांनी पण केलं. करायलाच हवं होतं.
पण मंडण करताना कच खालली🤦🏻‍♂️
१७३७ मध्ये ६००००+ सैन्य घेऊन दिल्लीला आव्हान देणारे थोरले बाजीराव हे पहिले मराठा योद्धे. यात कहर कसला?
महादजी शिंदे यांनी राऊसाहेबांच्या मृत्यूनंतर ३१ वर्षांनी दिल्ली जिंकली.
१६/२०
थोरल्या राऊसाहेबांनी पुण्यश्लोक शाहूछत्रपतींच्या आज्ञेवरुनंच दिल्लीवर चढाई केलेली.
एवढंच नाही तर याच मोहीमेसाठी शाहूछत्रपतींनी राऊंची मदत न करणाऱ्या यशवंतराव दाभाडे यांना ताकीद ही दिलेली.
कुबेरांनी माती खालली म्हणून राऊस्वामींचा पराक्रम झाकायचा याला काय अर्थ आहे🤷🏻‍♂️
१७/२०
पाटील बाबांच्या (महादजी) अफाट कामगिरीचा उल्लेख कुबेरांनी नाही केला हे दुर्दैवंच.
पण या साठी थोरल्या बाजीरावांना दोष देणं हा मूर्खपणा आहे.
हे बाजारु विचारवंत तर असं बोलत आहेत जसं कि थोरल्या बाजीरावांनीच कुबेरांना सांगितलं त्यांची तुलना शिवछत्रपतींसोबत करायला🤦🏻‍♂️
१८/२०
अशा वादांच्या मागे लपून B-ग्रेडी बाजारु विचारवंत छत्रपती विरुद्ध पेशवे, शिंदे विरुद्ध होळकर, होळकर/शिंदे विरुद्ध पेशवे आदि नसलेले वाद पेटवायला बघतात.
सगळ्यांनी एक गोष्ट ध्यानात ठेवावी - या सगळ्या घरण्यांमध्ये असलेले स्नेह संबंध सिद्ध करायला अनेक समकालीन पत्र उपलब्ध आहेत.
१९/२०
शेवटी एकंच सांगू इच्छितो - कुठलाही लेखक, मग तो कोणत्याही जातीचा असो, स्वत:चं मत मांडत असतो, संपूर्ण समाजाचं नाही.
अशा लिखाणाचं खंडण जरुर करा पण मंडण करताना कुठल्यातरी एका जाती ला शिव्या घालून स्वत:चा विषारी अजेंडा नका चालवू.
२०/२०
Unroll @rattibha

جاري تحميل الاقتراحات...